Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासात ४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, ७१ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासात ४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, ७१ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासात ४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, ७१ जणांचा मृत्यू

मुंबईतील रुग्णसंख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आजही मुंबईत ४ हजार ५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ६ हजार ४३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आज रुग्णसंख्येतही किंचित घट झाली आहे. मुंबईत आज ३ हजार ३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मुंबईत ३० एप्रिल ते ६ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.५१ टक्के इतका आहे. मुंबईतील रोज नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुंबईत मुंबईत आज ३५ हजार २२४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ३ हजार ३९ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.


मुंबईचा रिकव्हरी रेट आता ९० टक्क्यांवर आला आहे. मुंबईत होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. आज मुंबईत ७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १३ हजार ६८७ इतका आहे. मुंबईत आतापर्यंत करण्यात आलेल्या ५६ लाख ४४ हजार ४०२ कोरोना चाचण्यांपैकी ६ लाख ७१ हजार ३९४ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

मुंबईत सध्या ९६ कंटेनमेंट झोन आहेत. तर ६१७ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मुंबईतील पालिकेकडून कोणत्याही इमारतीमध्ये पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढल्यास संपूर्ण इमारत मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये एका आठवड्यात ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सध्या ७२८ सक्रिय मायक्रो कंटेनमेंट झोन आहेत.


हेही वाचा – Corona Vaccination : दादरचे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र बंद; पर्याय आता स्टेडियम, खुल्या मैदानांचा

First Published on: May 7, 2021 8:18 PM
Exit mobile version