Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईचा रिकव्हरी रेट ९२ टक्के,तर १ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: दिलासादायक!  मुंबईचा रिकव्हरी रेट ९२ टक्के,तर १ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर

मुंबई पॅटर्नचा डंका देशभरात गाजत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोना नियंत्रणात आणणाऱ्या ‘मुंबई मॉडेल’चे आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक करण्यात आले. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९१ टक्क्यांहून ९२ टक्क्यांवर आला. त्याचप्रमाणे आज मुंबईतील रुग्णसंख्येतही घट झाली आहे. मुंबईत आज १ हजार ७१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईत काही अंशी रुग्णांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. आजही मुंबईत बाधित रुग्णांपेक्षा रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत आज ६ हजार ८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६ लाख २३ हजार ८० इतकी झाली आहे.


मुंबईत काल ७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज हीच संख्या ५१ इतकी आहे. आज ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत २८ हजार २५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार ७१७ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत ४ मे ते १० मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.३९ टक्के इतका आहे. तर मुंबईत सध्या कंटेनमेंट झोनची संख्या हळू हळू कमी होत आहे. मुंबईत सध्या ८१ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ४७९ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईतील संख्या झपाट्याने कमी होत आहे. मुंबई पॅटर्नचे पंतप्रधानांनीही कौतुक केले. मुंबईनंतर पुण्यातही रुग्णसंख्याही झपाट्याने कमी झाली. कोरोनाच्या योग्य प्रतिबंधात्मक हाताळणीबद्दल मुंबई पुणे मॉडेलचे आरोग्य मंत्रालयाकडूनही कौतुक करण्यात आले आहे. मुंबई पुणे मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय व्हायला हवी,असे म्हणत आरोग्य मंत्रालयाकडून मुंबईचे कौतुक होत आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona update: कोरोनाचा धोका कायम! ४०,९५६ रुग्ण, ७९३ जणांचा मृत्यू

 

First Published on: May 11, 2021 8:19 PM
Exit mobile version