Maharashtra Corona update: ४०,९५६ नव्या रुग्णांची नोंद, ७९३ जणांचा मृत्यू

राज्यात एकाच दिवसात ७१,९६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले

Maharashtra Corona Update reports 9,170 new cases 7 deaths today and 6 new Omicron cases were reported
Maharashtra Corona Update: राज्यातील आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार!; ६ ओमिक्रॉनबाधित आढळले

राज्यात कोरोनच्या दुसऱ्या लाटेचे तीव्र पडसाद उमटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव जलद होत असल्यामुळे दिवसाला मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. परंतु दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा वाढता आकडा हा राज्याची चिंता दर्शवणारा आहे. गेल्या २४ तासात एकुण ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात एकुण ४० हजार ९५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्याची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी असली तरी गेल्या २४ तासात ७१ हजार ९६६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असल्याची दिलासादायक बाब आहे.

राज्यात एकाच दिवसात ७१,९६६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४५,४१,३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.६७% एवढे झाले आहे. तर ४० हजार ९५६ कोरोनाबाधितांची नव्याने भर झाली आहे. तसेच ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

महाराष्ट्रात एकुण आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९८,४८,७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,७९,९२९ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,९१,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,५८,९९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आज नोंद झालेल्या एकूण ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२० मृत्यू, नाशिक- ४७, नागपूर- ३४, बीड- २२, नांदेड- २२, पुणे- १७, ठाणे- १४, लातूर- ११, जालना- १०, नंदूरबार- १०, अहमदनगर- ५, धुळे- ५, गडचिरोली- ४, परभणी- ४, सोलापूर- ३, उस्मानाबाद- २, रत्नागिरी- २, सांगली- २, भंडारा- १, गोंदिया- १, जळगाव- १, कोल्हापूर- १, रायगड- १ आणि पालघर- १ असे आहेत.

राज्यातील १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण मंदावणार

केंद्र सरकारकडून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. परंतु राज्यात सध्या ३५ हजार कोवॅक्सीन उपलब्ध आहेत. ४५ वर्षांवरील नागरिकांचे दुसरा डोस देण्याची वेळ आली असून त्यांची संख्या जवळपास ५ लाख आहे. तसेच राज्य शासनाकडे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी जे कोवॅक्सीन डोस उपलब्ध आहेत. त्यातील साठा आता ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. या लसींचे डोस वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याची चर्चा करुन घेतला आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाचा वेग मंदावणार आहे.