Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! मुंबईत आज एकही कोरोना मृत्यू नाही

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! मुंबईत आज एकही कोरोना मृत्यू नाही

Mumbai Corona Update: no corona death in Mumbai today

मुंबई पालिकेच्या सक्षम आरोग्य यंत्रणेमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली. मुंबईकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे कारण मुंबईत आज एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा मुंबईत शून्य कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनाचे संकट मुंबईत आल्यापासून चौथ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत १७ ऑक्टोबर रोजी २०२१ वर्षातील पहिली शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर ११ डिसेंबर आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत कोरोनाची शून्य मृत्यूनोंद करण्यात आली आहे. आज १८ डिसेंबरला देखील मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

मुंबईतील आज नोंद झालेल्या रुग्णांचा विचार केला असता मुंबईत आज २८३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २७५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच मुंबईत आज एकूण ५१ हजार १७१ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. मुंबईत सध्या १ हजार ९४८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतील सध्याचा कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर ९७ टक्के इतका आहे.

मुंबईत शनिवारी ओमिक्रॉनचे ४ नवे रुग्ण 

मुंबईत सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण देखील आढळून येत आहेत. मुंबईत आज ४ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईतील एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १८ इतकी झाली आहे. मुंबईत शनिवारी चार रुग्ण विमानतळावरील चाचणी दरम्यान आढळले आहेत. यातील ३ रुग्ण हे छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील आहेत. दोघेजण दक्षिण आफ्रिकेतून, एक रुग्ण टांझानिया आणि एक रुग्ण इंग्लडहून आला आहे. चौघांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत मात्र तरीही त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.


हेही वाचा – दर ३ दिवसांनी दुप्पट होत आहेत Omicronचे रुग्ण, WHO चा धक्कादायक खुलासा

First Published on: December 18, 2021 9:56 PM
Exit mobile version