Mumbai Corona Update: आज ७ हजार ३८१ नव्या रुग्णांची नोंद, ५७ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: आज ७ हजार ३८१  नव्या रुग्णांची नोंद, ५७ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: no corona death in Mumbai today

मुंबईसह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. मुंबईतही आकडेवारी कमी जास्त होताना दिसत आहे. गेली ३ दिवस मुंबईची आकडेवारी ८ हजारांच्या पुढे नोंदवण्यात येत होती. आज मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत आज ७ हजार ३१८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ५८ लाख ६ हजार ६९२ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १२ हजार ४०४ जणांनी आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.


आज मुंबईत नोंद करण्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत आज एकूण ८ हजार ५८३ रुग्ण बरे होऊन सुखरुपणे घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत मुंबईत ४ लाख ८६ हजार ६२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोना चाचण्या देखिल वाढविण्यात आल्या आहेत. आज मुंबईत ३६ हजार ५५६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ८३ टक्के इतका आहे. तर १२ एप्रिल ते १८ एप्रिलपर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा १.४६ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या १०६ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १ हजार १७१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईतील ३५ खासगी लसीकरण केंद्र बंद

मुंबईसह राज्यात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र काही दिवसातच कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळे मुंबईतील ३५हून अधिक खासगी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि आता कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे.


हेही वाचा – बंद खोलीत कोरोना संक्रमणाचा धोका कशामुळे वाढतोय? जाणून घ्या

 

 

 

First Published on: April 19, 2021 8:06 PM
Exit mobile version