घरCORONA UPDATEबंद खोलीत कोरोना संक्रमणाचा धोका कशामुळे वाढतोय? जाणून घ्या

बंद खोलीत कोरोना संक्रमणाचा धोका कशामुळे वाढतोय? जाणून घ्या

Subscribe

बंद खोलीमध्ये हवेतील विषाणू मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतात.

कोरोना संक्रमणाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग आता हवेतून होत असल्याचे समोर आले आहे. हवेतील संक्रमण होण्याला एअरबोर्न ट्रान्समिशन म्हटले जाते. कोरोना महामारीच्या सुरुवातील कोरोना व्हायरस हवेतूनही पसरु शकतो असा दावा अनेक देशांच्या वैज्ञानिकांनी केला होता. मात्र हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र आता ‘द लॅसेंट’ने केलेल्या अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरस हवेतूनही पसरतो. हवेच्या मार्फतही कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. बंद खोलीतही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हवेतून कोरोना संसर्ग होत आहे. हवेत कोरोना व्हायरचे विषाणू जिवंत राहतात. त्यामुळेच रुग्णालय किंवा हॉटेलच्या बंद खोलीतही कोरोना संक्रमण होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण शिंकला आणि खोकल्यानंतर किंवा बोलण्यानंतर नाक आणि तोंडातून येणाऱ्या ड्रॉपलेट्सचे संक्रमण होते. वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार असे म्हणले आहे की, हे ड्रॉपलेट्सचे हवेच्या मार्फत संक्रमण होते. हवेतून सर्वात जलद गतीने  ते संक्रमित होतात. त्यामुळेच हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या लोकांना बंद खोलीतूनही कोरोनाचे संक्रमण होत आहे.

- Advertisement -

बाहेरची हवा कोरोना विषाणूमुळे दूषित झाली आहे. याचाच अर्थ असा की बाहेरच्या हवेत कोरोनाचे विषाणू आहेत. मात्र बंद खोलीमध्ये हवेतील विषाणू मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतात. बंद खोलीत बाहेरची खेळती हवा येत नाही. अशी हवा स्थिर असते त्यामुळे ती दूषित होते. ज्यामुळे बंद खोलीत इतर लोकांनाही कोरोना संक्रमणाचा धोका निर्माण होतो, अशी माहिती मेरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसीनच्या डॉक्टर फहीम यूनुस यांनी ट्विटच्या माध्यामातून दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Covid-19 चे लक्षणं असूनही रिपोर्ट Negative; कोरोना टेस्ट करताना घ्या ‘ही’ काळजी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -