Corona Update : मुंबईत कोरोनाचे ९२५ नवे रुग्ण; तर ४६ जणांचा मृत्यू

Corona Update : मुंबईत कोरोनाचे ९२५ नवे रुग्ण; तर ४६ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: ब्रेकिंग! मुंबईत बुधवारी २,५१० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले

मुंबईमध्ये ९२५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २४ हजार ३२२ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ हजार ८४२ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये ९२५ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २६ पुरुष तर २० महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३० जण हे ६० वर्षांवरील, तर १२ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाच्या १ हजार ४०७ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९७ हजार ९९३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. तर शहरात १९ हजार १९० सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. तसेच राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा –

चाकमान्यानू लक्ष देवा! कोकणात जाणार्‍यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक

First Published on: August 10, 2020 9:04 PM
Exit mobile version