घरमहाराष्ट्रचाकमान्यानू लक्ष देवा! कोकणात जाणार्‍यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक

चाकमान्यानू लक्ष देवा! कोकणात जाणार्‍यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक

Subscribe

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीने ६ ते १२ ऑगस्ट अखेरपर्यंत ५५० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र आता यांची मुदत वाढवण्यात आली आहे. आता १३ ते २१ ऑगस्टपर्यंत कोकणात चाकरमान्यांना जाता येणार आहे. मात्र १३ ऑगस्टपासून प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना कोरोनाची चाचणी अनिवार्य केली आहे.

गौरी गणपतीच्या उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनासाठी एसटी बसेस सुरु झाल्या आहेत. ६ ऑगस्ट पासून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणार्‍याचाकरमान्यांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरु केल्या आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत १० हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी एसटीचे आगाऊ आरक्षित केले आहे. तर गुरुवार ते रविवार या चार दिवसात एकूण १५० बसद्वारे २ हजार ५०० चाकरमान्यांनी आपले गाव गाठले. ११ ऑगस्ट म्हणजेच मंंगळवारी सर्वाधिक म्हणजेच १०९ गाड्या कोकणात जाणार आहेत.

- Advertisement -

एसटीची सुविधा फक्त ६ ते १२ ऑगस्ट अखेरपर्यंत होती. मात्र आता प्रवासी संख्या लक्षात घेता. एसटी महामंडळाने यांची मुदत वाढवण्यात आली आहे. आता १३ ते २१ ऑगस्टपर्यंत कोकणात चाकरमान्यांना जाता येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तथापि, या प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असून ही चाचणी निगेटिव्ह असल्यास संबंधितांना प्रवास करता येईल. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या बसेस आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच प्रवासासाठी स्वतंत्र रित्याई-पासची आवश्यकता असणार नाही, असे महामंडळाकडून कळवण्यात आले आहे.

कोकणात जाणार्‍या बसेस योग्यरीत्या सॅनिटाईझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असून, कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी व नैसर्गिक विधीसाठी वाहने थांबवण्याची दक्षता महामंडळाने घेतली असून प्रवासा दरम्यान प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची तसेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -