Mumbai Crime Branch : बिल्डरचे अपहरण करून खंडणी मागणारा गॅंगस्टर बचकानाच्या आवळल्या मुसक्या

Mumbai Crime Branch : बिल्डरचे अपहरण करून खंडणी मागणारा गॅंगस्टर बचकानाच्या आवळल्या मुसक्या

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी (24 नोव्हेंबर) संध्याकाळी कुख्यात गुंड इलियास बचकाना याला अटक केली. मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राऊंडजवळ इलियासला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेमुळे मुंबईतील नामांकित बिल्डरांनी सुटकेचा निश्वास सोडल्याची माहिती समोर येत आहे. (Mumbai Crime Branch A gangster who kidnaps a builder and asks for ransom smiles like a child)

इलियास बचकाना याने हिफजूल रहमान नावाच्या बिल्डरचे अपहरण केले होते. तसेच त्याच्या कुटुंबीयांना बोलावून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न मिळाल्याने आरोपी इलियासने रेहमानला बेदम मारहाण केली. क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी रेहमानची सुटका करून रुग्णालयात दाखल केली असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लाल रंगाच्या कारमधून येऊन केले होते अपहरण

23 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास तीन अज्ञातांनी मुंबईतील भायखळा परिसरातून बिल्डर हिफजूल रहमान यांचे अपहरण केले होते. विश्सनिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण करणाऱ्यांनी बिल्डर रेहमानच्या कुटुंबाकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. हिफजूल रेहमान भायखळा परिसरातील माझगाव सर्कलजवळ असताना लाल रंगाच्या मारुती सुझुकी सियाझ कारमधून अपहरण करणारे आरोपी आले आणि त्यांनी बिल्डर रेहमानचे अपहरण केले होते. अपहरणकर्ता बिचकाना आणि रेहमान या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून जुना वाद होता. त्यामुळे आरोपी इलियास बचकाना याने रेहमानचे अपहरण केले असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : ‘अजित पवारांनी पक्षातील एकही पद भुषवलं नाही, पवारांनी रक्त आटवलं’; दादांकडूनही पलटवाराच्या फैरी

मुलाच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल

अपहरणानंतर आरोपींनी बिल्डरच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांच्याकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी रेहमान यांचा मुलगा आकिब अन्सारी याच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने इलियास बचकाना या गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीला गोवंडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.

First Published on: November 25, 2023 3:33 PM
Exit mobile version