घरताज्या घडामोडी'अजित पवारांनी पक्षातील एकही पद भुषवलं नाही, पवारांनी रक्त आटवलं'; दादांकडूनही पलटवाराच्या...

‘अजित पवारांनी पक्षातील एकही पद भुषवलं नाही, पवारांनी रक्त आटवलं’; दादांकडूनही पलटवाराच्या फैरी

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काका – पुतण्याची लढाई आता निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि संसदेतही सुरु आहे. कुटुंबात सर्वकाही आलबेल असल्याचे दिवाळी-भाऊबीजेनिमित्ताने दाखवण्यात आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मोठी धुसफूस असल्याचे वारंवार समोर येत आहे.

शरद पवारांनी पक्षासाठी रक्त आटवलं – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे यासाठी निवडणूक आयोगात लढाई सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार गट यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाने पुन्हा एकदा अजित पवारांच्या बनावट शपथपत्रांचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवारांच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, शरद पवारांनी रक्त आटवून पक्ष वाढवला आहे. पक्षाच्या विस्तारात अजित पवारांचा कुठलाही हातभार राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजित पवारांनी पक्षाच्या कोणत्याही पदावर काम केलेले नाही. त्यांनी फक्त संविधानीक पदे उपभोगली, अशा शब्दात आव्हाडांनी शुक्रवारी सुनावणीनंतर टीका केली होती.

- Advertisement -

आमदार आव्हाड म्हणाले की, शरद पवारांनी घामाचा एक-एक थेंबच नाही रक्त आटवून पक्ष वाढवला, पक्षाचा विस्तार केला. 2004 मध्ये तोंडातून रक्त वाहत असताना शरद पवार प्रचाराला फिरले. मांडीचे हाड मोडलेले असतानाही त्यांनी पक्षाचे काम थांबवले नाही. याला म्हणतात पक्षासाठी जीव आणि प्राण देणे. अजित पवारांनी आजपर्यंत एकदाही पक्षाचे पद भुषवले नाही. त्यामुळे पक्ष वाढवण्यात आणि एका पोराला मोठं करण्यात बापाचे योगदान असते, ते शरद पवारांनी पक्षासाठी केले आहे.

आव्हाडांनी पक्षासाठी काय केले, अजित पवार गटाचा सवाल

जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेला आता अजित पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन आव्हाडांवर पलटवार केला आहे.
ते म्हणाले, “अजित पवार आणि शरद पवारांनी तुम्हाला वैद्यकीय शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. यातुन तुम्हाला राज्यात काम करण्याची संधी दिली. महाविकास आघाडीच्या काळात गृहनिर्माणसारखे महत्त्वाचे खाते दिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष, ठाणे शहराध्यक्ष आणि आता राष्ट्रीय सरचिटणीस ही पदं देऊन संघटना बळकट करण्याची संधी दिली. मात्र तुमच्या कार्यशैलीला कंटाळून पालघर आणि ठाण्यातील कार्यकर्ते सोडून गेले.” असा पलटवार केला आहे. त्यासोबत चव्हाण यांनी आव्हाडांच्या वक्तव्याशी सुप्रिया सुळे सहमत आहेत का, असाही सवाल केला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनीही सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -