Mumbai Crime News : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक

Mumbai Crime News : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका वॉण्टेड आरोपीस ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. अब्दुल सदावत खान असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या इतर सहकार्‍यांनी भाड्याने कार घेण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पावणेपाच लाख रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाइल देखील जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडीत सुनावली आहे. (Mumbai crime news accused of online fraud arrested; Fraud of a young man by saying that he will give a car for rent)

या गुन्ह्यात त्याच्यासह इतर सात आरोपींचा सहभाग होता. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष शोधमोहीम सुरू केली आहे. तक्रारदार तरुणाने जानेवारी २०२४ मध्ये भाड्याने कारसाठी गुगलवर एका ट्रॅव्हल्स कंपनीची माहिती सर्च केली. यावेळी त्याला एक मोबाइल क्रमांक सापडला. त्या नंबरवर संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून दिली. ही लिंक ओपन केल्यानंतर तक्रारदाराच्या खात्यातून सुमारे पावणेदोन लाख रुपये ट्रान्स्फर करून घेतले.

पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याने ना.म. जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन अब्दुलला सांताक्रुज येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याला या गुन्ह्यांत इतर सात आरोपींनी मदत केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे सहा मोबाइल जप्त केले असून त्यांची किंमत पावणेपाच लाख रुपये आहे. (Mumbai crime news accused of online fraud arrested; Fraud of a young man by saying that he will give a car for rent)

हेही वाचा – Mumbai Crime News : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत 98 लाखांची फसवणूक
—————————————-

Accident News : अपघातात दोघांचा मृत्यू; सांताक्रुज-काळबादेवीतील घटना

मुंबई : अपघाताच्या दोन घटनेत एका अज्ञात व्यक्तीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुज आणि काळबादेवी परिसरात घडली. याप्रकरणी वाकोला आणि एल.टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. पहिला अपघात गुरुवारी पहाटे पावणेचार वाजता सांताक्रुज येथील वाकोला ब्रिजवर झाला. अब्दुल वहाब मोहम्मद शेख हे गोवंडी येथे राहत असून टॅक्सीचालक म्हणून काम करतात. गुरुवारी पहाटे सव्वातीन वाजता ते मालवणीतून एका प्रवाशाला घेऊन सांताक्रुजच्या दिशेने जात होते. ही टॅक्सी पावणेचार वाजता वाकोला ब्रिजवर आली. यावेळी वांद्रेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या एका कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायडरला जोरात धडक दिली. या धडकेमुळे कारने एका टॅक्सीला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. विवेक विद्याप्रसाद मिश्रा याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर कारचा चालक सम्यक राणीवालासह इतर जखमींवर उपचार करण्यात आले. याप्रकरणी अब्दुल वहाब याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक सम्यक मयंक राणीवाला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Accident news two killed in accident; incident in Santacruz-Kalbadevi)

दुसरा अपघात शामलदास गांधी मार्गावरील वर्धमान जंक्शनजवळ झाला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृत व्यक्ती गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजता वर्धमान जंक्शनजवळ रस्ता क्रॉस करत होती. यावेळी एका बेस्ट बसने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला जवळच्या जी.टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी एल.टी मार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद करून बसचालक आशिष नरेंद्र साळुंखे याला अटक केली.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 19, 2024 9:03 PM
Exit mobile version