घरक्राइमMumbai Crime News : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत 98 लाखांची फसवणूक

Mumbai Crime News : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत 98 लाखांची फसवणूक

Subscribe

Mumbai Crime News : गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून एका टोळीने अनेकांची सुमारे 98 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. पोलीस सेवेतून निवृत्त झालेले एसीपी आणि त्यांच्या कुटुंबियांसह इतर गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

मुंबई : गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून एका टोळीने अनेकांची सुमारे 98 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. पोलीस सेवेतून निवृत्त झालेले एसीपी आणि त्यांच्या कुटुंबियांसह इतर गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सबिरसिंग, भाविन शहा आणि प्रमोद गांगुर्डे अशी या तिघांची नावे असून ते तिघेही कुबेर डिजिटल मार्केटिंग कंपनीचे संचालक आहेत. लवकरच या तिन्ही संचालकांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. यातील तक्रारदार मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले असून ते पुण्याच्या कोथरुड परिसरात राहतात. (Mumbai Crime News 98 lakhs fraud with lure of attractive interest; retired ACP included among those duped)

मेघवाडी विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त असताना त्यांचा मित्र भाविन शहाले याची इतर दोन आरोपींशी त्यांनी ओळख करून दिली होती. या ओळखीत भाविनने जसबिरसिंग आणि प्रमोद त्याचे मित्र असून त्यांनी एक नॉन बँकिंग कंपनी स्थापन केल्याचे सांगितले. कुबेर इन्वहेस्टमेंटस ऍण्ड प्रॉपटीज नावाची एक कंपनी असून अंधेरी येथे त्यांच्या कंपनीचे एक कार्यालय आहे. या कंपनीत त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांना साडेपाच टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी त्यांना 36 महिन्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी लोणावळा येथे एका सेमिनारचे आयोजन केले. या सेमिनारमध्ये तक्रादार पोलीस अधिकार्‍यासह इतर गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

- Advertisement -

गुंतवणुकीची रक्कम कंपनी कुठे गुंतवविणार आहे, त्यातून कंपनीला किती नफा होईल, आणि गुंतवणूकदाराला कसा फायदा होईल याची माहिती या सेमिनारमध्ये देण्यात आली होती. या माहितीला भुलून 20 ते 22 जणांनी कंपनीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. या सर्वांचा एक ग्रुप तयार करण्यात आला. तक्रारदार, त्यांची मुलगी आणि मुलगा अशा तिघांनी मिळून सुमारे 75 लाखांची गुंतवणूक केली होती. (Mumbai Crime News 98 lakhs fraud with lure of attractive interest; retired ACP included among those duped)

या गुंतवणुकीवर त्यांना ऑगस्ट 2022 पर्यंत ठराविक रक्कमेचे व्याज मिळाले होते. मात्र नंतर त्यांनी व्याजदर देणे बंद केले. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांनी त्यांच्याकडे विचारणा सुरू केली होती. मात्र, या तिघांकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारे या तिघांनी बोगस कंपनीच्या नावाने आकर्षक व्याजदार देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार पोलीस अधिकार्‍यासह इतर गुंतवणूकदारांची सुमारे 98 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जसबिरसिंग, भाविन शहा आणि प्रमोद गागुर्डे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai Crime News 98 lakhs fraud with lure of attractive interest; retired ACP included among those duped)

- Advertisement -

Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -