Juhu Rape Case : जुहू बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी गुंडाप्पा देवेंद्रला फाशी, दिंडोशी न्यायालयाचा सलग दुसरा निर्णय

Juhu Rape Case : जुहू बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी गुंडाप्पा देवेंद्रला फाशी, दिंडोशी न्यायालयाचा सलग दुसरा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी जनतेमध्ये आपल्याबद्दल अपप्रचार करुन बदनामी केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात मे 2021 मध्ये अवमान याचिका दाखल केली होती.

जुहू बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्रला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. 2019 मध्ये जुहूमध्ये एका नऊ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार तिची हत्या केली, याच प्रकरणातील खटल्यावर आज निकाल देण्यात आला, मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने आज सलग दुसऱ्या दिवशी या प्रकरणातील आरोपीलाही फाशीची शिक्षा दिली आहे.

नेमक प्रकरण काय?

4 एप्रिल 2019 रोजी विलेपार्लेमधील एका नऊ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्र असं या आरोपीचे नाव आहे. नऊ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी अटकेतील गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्र या 33 वर्षांच्या आरोपीला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

त्याच्याविरुद्ध अपहरण, हत्या, लैगिंक अत्याचारासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून या सर्व कलमात त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. यातील तक्रारदार विलेपार्ले येथील नेहरुनगर झोपडपट्टी त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांची मुलगी नऊ वर्षांची तर एक मुलगा पाच वर्षांचा असून ते दोघेही त्याच परिसरातील एका शाळेत शिकतात. नऊ वर्षाची पिडीत मुलगी तिसरीत शिकत होती. 4 एप्रिलला ती दुकानात चहापत्ती आणण्यासाठी गेली होती, मात्र बराच वेळ होऊनही ती घरी आली नाही, त्यामुळे तिच्या आईने तिचा शोध सुरु केला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिचा आसपासच्या परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती कुठेच दिसली नाही म्हणून त्यांनी रात्री उशिरा जुहू पोलिसांत त्यांची नऊ वर्षांची मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार केली होती.

याप्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून या मुलीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच दुसर्‍या दिवशी पोलिसांनी वडिवेल देवेंद्र या सराईत गुन्हेगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्यानेच या मुलीचे अपहरण केले होते. तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिची गळा आवळून हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जवळच्या सार्वजनिक शौचालयाजवळ टाकून पलायन केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नेहरुनगर, श्रीलंका चाळ शौचालयाजवळ या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला होता.

या घटनेनंतर वडिवेल देवेंद्रविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह लैगिंक अत्याचार, हत्या आणि बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्याविरुद्ध नंतर दिडोंशी सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने त्याला दोषी ठरविले होते. शुक्रवारी त्याला कोर्टाने पोक्सोसह आयपीसी कलम 302, 376, 363, 201 कलमांतर्गत कारावासासह दंडाची तसेच हत्येच्या गुन्ह्यांत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक अशोक सावंत यांनी केला होता.

साकीनाका बलात्कार व हत्येतील आरोपीला फाशी

मुंबईसह देशाला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी गुरुवारी आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान हे प्रकरण दुर्मिळ असल्याचे म्हणत राज्य सरकारने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. याावेळी मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. एकूण 364 हे आरोपपत्र होते.


आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामांची पाहणी करा; मंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पावसाळापूर्व कामांचा आढावा


First Published on: June 3, 2022 7:57 PM
Exit mobile version