Mumbai Crime News : सोने तस्करीप्रकरणी तीन महिलांना अटक, हवाई गुप्तचर विभागाची कारवाई

Mumbai Crime News : सोने तस्करीप्रकरणी तीन महिलांना अटक, हवाई गुप्तचर विभागाची कारवाई

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी तीन महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाकडून अटक करण्यात आली आहे. रुबीना बानो खाजा शेख, मेरी जेणे मेला आणि मेला औरडोनेझ अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत या अधिकार्‍यांनी सुमारे दोन कोटीचे सोने जप्त केले आहेत. अटकेनंतर तिन्ही महिलांना स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. (Mumbai Crime News : Three women arrested in gold smuggling case)

मिळालेल्या माहितीनुसार, रुबीना शेख ही महिला आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला आहे. ती विदेशातून सोने तस्करी करणार्‍या आरोपींना मदत करत असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यामुळे तिच्यावर या अधिकार्‍यांन साध्या वेशात पाळत ठेवली होती. दोन दिवसांपूर्वी विमानतळावर बाहेर जात असताना तिला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीत तिने दोन महिलांच्या सांगण्यावरुन विदेशातून आणलेले बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

हेही वाचा… Vasai Abduction case: तुरुंगातून सुटून आल्यानंतर मुलीच्या पित्याला मारहाण

त्यानंतर या अधिकार्‍यांनी मेरी मेला आणि मेला औरडेनेझ या दोन महिलांना ताब्यात घेतले. या दोन्ही महिलांनी विदेशातून काही सोने आणले होते, मात्र विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच त्या विमानतळावरील कर्मचार्‍यासाठी असलेल्या टॉयलेटमध्ये गेल्या होत्या. त्यांनी रुबीना सोन्याची पेस्ट असलेले पाऊच विमानतळाबाहेर आणण्यास सांगितले. या कामासाठी तिला 20 हजार रुपयांचे कमिशन देणयात आले होते. पैशांच्या आमिषाला बळी पडून तिने सोन्याची पेस्ट बाहेर नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यापूर्वीच तिला या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने या कारवाईत दोन कोटीचे सोने जप्त केले आहेत. सोने तस्करीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या तिन्ही महिलांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा… Vasai Abduction case: तुरुंगातून सुटून आल्यानंतर मुलीच्या पित्याला मारहाण

First Published on: April 11, 2024 11:04 PM
Exit mobile version