घरपालघरVasai Abduction case: तुरुंगातून सुटून आल्यानंतर मुलीच्या पित्याला मारहाण

Vasai Abduction case: तुरुंगातून सुटून आल्यानंतर मुलीच्या पित्याला मारहाण

Subscribe

त्यानंतर पीडित मुलीच्या आई -वडिलांनी मुलीचे आरोपीशी असलेले संबंध तोडून टाकले होते.

वसई : मागील वर्षी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीने तुरुंगातून सुटून आल्यानंतर मुलीच्या पित्याला घरात घुसून बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी मीरा- रोड येथील नया नगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.मीरा -रोडच्या शांती नगर येथे राहणार्‍या एका अल्ववयीन मुलीला मागील वर्षी आरोपी समीर सिंग (२८) याने फूस लावून पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने नया नगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, ही मुलगी आणि आरोपी सिंग हे पंजाबमध्ये लपून असल्याचे आढळले होते. पोलिसांनी पंजाब येथे जाऊन आरोपीला अटक करून मुलीची सुटका केली होती. त्यानंतर पीडित मुलीच्या आई -वडिलांनी मुलीचे आरोपीशी असलेले संबंध तोडून टाकले होते.

यामुळे तुरुंगातून सुटून आल्यानंतर जाब विचारण्यासाठी आरोपी समीर सिंग आणि त्याचा साथीदार राम तिरूवा (२७) हे सोमवारी पुन्हा मुलीच्या घरी गेले. मात्र यावेळी मुलीचे वडील आणि आई यांनी विरोध केला. यावेळी आरोपी समीर आणि राम या दोघांनी मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी वडिलाने नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून नया नगर पोलिसांनी आरोपी समीर सिंग आणि राम तिरूवा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली,अशी माहिती नया नगर पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -