मुंबईचे डबेवाले ३ एप्रिलपासून जाणार सहा दिवसांच्या सुटीवर

मुंबईचे डबेवाले ३ एप्रिलपासून जाणार सहा दिवसांच्या सुटीवर

मुंबईचे डब्बेवाले

मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले ३ एप्रिलपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. ३ ते ८ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार असल्याची माहिती मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या विष्णू काळडोके यांनी दिली. (Mumbai Dabbawala will go on a six day holiday from April 3)

मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर मुंबईकरांची क्षुधा शांत होते, ते डबेवाले सोमवार ३ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर आहेत. ३ ते ८ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहे. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील.

मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर या भागातील गावांमधून येतात. त्या ठिकाणी गावा कडील कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे ३ ते ८ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे. मात्र, या सहा दिवसांच्या सुट्टीत महावीर जयंती, गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले चार दिवस सुट्टी घेणार असून सोमवार, १० एप्रिलपासून ही सेवा डबेवाले पुन्हा सुरू करणार आहे.

१० एप्रिलपासून पुन्हा सकाळी डबेवाला नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर हजर होऊन आपली सेवा देईल. उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेज, यांना सुट्टी लागली आहे त्या मुळे त्या डब्यांची सेवा बंद आहे. तसेच सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे त्यांची ही सेवा काही प्रमाणात कमी झाली आहे. डबेवाले सुट्टीवर गेल्याने काही ग्राहकांची गैरसोय होणार असल्याने मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ आणि मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी विनंती विष्णू काळडोके यांनी केली आहे.


हेही वाचा – संभाजीनगर दंगलीप्रकरणी फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, चिथवणारी वक्तव्ये…

First Published on: March 30, 2023 2:39 PM
Exit mobile version