मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरूवारी रात्री भीषण आग लागली. गेल्या अकरातासांपासून अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग आटोक्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या ४०० हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

असा घडली घटना

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलला गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली. यावेळी आगीचे भीषण रूप पाहून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. आग विझवण्यासाठी गेल्या दहा तासांपासून अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सिटी सेंटर मॉलमध्ये जवळपास २०० हून अधिक दुकानं असून या सर्व दुकानांमध्ये मोबाईल अॅक्सेसरीजची दुकाने आहेत. त्यामुळे या आगीत या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीषण आग असल्याने मुंबई अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आलेली आहे. ब्रिगेड कॉल अर्थात लेव्हल ५ च्याही पुढचा कॉल. म्हणजेच मुंबईतील अग्निशमन दलाची सर्व केंद्र आहेत, तिथून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी तिथून यंत्रणा मागवण्यात आल्या आहेत.दरम्यान, आगीची स्थिती भीषण असल्याने आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. ४० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.


एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत करणार पक्षप्रवेश

First Published on: October 23, 2020 8:47 AM
Exit mobile version