मुंबईत सायन कोळीवाड्यातील इमारतीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईत सायन कोळीवाड्यातील इमारतीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात आज 19 मजली रहिवासी इमारतीच्या 7 व्या मजल्यावर भीषण आगीची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र हा आग नेमकी कशामुळे लागली या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. या आगीत अद्याप सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

सायन कोळीवाडा परिसरातील एमए रोडवर ही 19 मजली ओम शिव शक्ती इमारत आहे. या इमारतीच्या 7 व्या मजल्यावर आज दुपारच्या सुमारास ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक जंबो वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.


हेही वाचा : खराब हवामानामुळे शिंदे-फडणवीसांचा जळगाव दौरा रद्द

First Published on: January 30, 2023 3:49 PM
Exit mobile version