घरमहाराष्ट्रखराब हवामानामुळे शिंदे-फडणवीसांचा जळगाव दौरा रद्द

खराब हवामानामुळे शिंदे-फडणवीसांचा जळगाव दौरा रद्द

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना आपला पूर्वनियोजित जळगाव दौरा अचानक रद्द करावा लागला आहे. खराब हवामानामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे. जळगावमधील महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमाला आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाला वेळेत पोहचण्यासाठी त्यांच्या शासकीय विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने (Air Pressure) विमानाला परत माघारी यावे लागले. यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते या कार्यक्रमाला हजर झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने (Air Pressure) विमानाला परत माघारी यावे लागले.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्यावतीने महाकुंभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानाने जळगावला पोहचणार होते, परंतु हवामान खराब असल्याने हा जळगाव दौरा रद्द करावा लागला. मात्र जळगावमधील हा कार्यक्रम महत्वाचा असल्याने दोघांना तिथे पोहचणं महत्वाचं होतं. मात्र अशा परिस्थितीत रस्ते मार्गाने मुंबई ते जळगाव अंतर अधिक असल्याने ते वेळेत कार्यक्रमाला पोहचू शकणार नव्हते. परंतु अर्धा तासानंतरही हवामान ठीक न झाल्यानेत्यांनी जळगाव दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्याच्या दिशेने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर निवासस्थानी रवाना झाले.

अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून जामनेर तालुक्यातील गोदरी येथे महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. यातून देशभरातील संतांच्या माार्गदर्शनामधून बंजारा समाजात एकजूट व्हावी, व्यसनापासून तरुणांनी दूर राहावं तसंच बंजारा समाजाचे धर्मांतर रोखण्यासाठी हा महाकुंभा सोहळा महत्त्वाचा मानला जातो. आज या महाकुंभाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरु रामदेव बाबा उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार होते. परंतु खराब हवामानामुळे त्यांचा जळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. पण ते या कार्यक्रमाला ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले.

- Advertisement -

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय विमानात बिघाड झाल्याने 5 जानेवारीचा त्यांचा असाच एक पुणे आणि औरंगाबाद दौरा रद्द झाला होता. यावेळी दोघांनाही एअरपोर्टच्या व्हीआयपी वेटिंग रुममध्ये थांबावं लागलं. या बिघाडामुळे दोघेही जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ एअरपोर्टवर ताटकळात उभे होते. यावेळी विमान बिघाड दुरुस्त न होऊ शकल्याने मुख्यमंत्र्यांनी आपला औरंगाबाद दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या ठाणे मतदारसंघाच्या दिशेने निघाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्ते मार्गे पुण्याला गेले होते.


अदानी ग्रुपविरोधातील हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर स्टेट बँक ॲक्शन मोडमध्ये

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -