Hight Tide Alert: उपनगरात जोरदार पाऊस; समुद्रात ४.७ मीटर उंच लाटा उसळणार

Hight Tide Alert: उपनगरात जोरदार पाऊस; समुद्रात ४.७ मीटर उंच लाटा उसळणार

मुंबईत समुद्रात उंच लाटा उसळणार

गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले आहे. मुंबई उपनगरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि राज्याच्या इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. तसेच आज दुपारी १.३० वाजता मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ४.७५ मीटरच्या लाटा (Hight Tide in Mumbai) उसळणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभाग, महानगरपालिका आणि पोलीश प्रशासन अलर्ट झाले आहे.

भरतीच्या वेली उंच लाटा उसळणार असल्यामुळे समुद्रकिनाऱ्या नजीक राहणाऱ्या लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे. तर काही ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रात २३ ऑगस्टपर्यंत पावसाची संततधार कायम राहील, असे सांगण्यात आले आहे.

आज सकाळपासूनच उपनगरात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हवामान विभागाचे अतिरीक्त संचालक के.एस. होसळीकर यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाच्या सरी पडतील.

पालघर जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस बरसणार असून रायगड सतत पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उत्तरेतील समुद्रात १९ ऑगस्ट रोजी कमी दाबाचा हवेचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याला जोरदार पावसाने झोडपले आहे.

First Published on: August 21, 2020 11:22 AM
Exit mobile version