Mumbai Local: रेल्वेचे महिलांना सुरक्षा कवच; लोकलमध्ये मिळणार ही सुविधा

Mumbai Local: रेल्वेचे महिलांना सुरक्षा कवच; लोकलमध्ये मिळणार ही सुविधा

महिलांसाठी लोकलमध्ये खास सुरक्षा

मुंबई: मागच्या काही महिन्यांपासून धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. वेळोवेळी यावर आवाज उठवूनही रेल्वेकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होताना, आता महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला सर्व महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Mumbai Local Railways Women s Safety Cover Panic Button and talk back system in women compartment)

तसंच, लोकलमधील 29 टक्के जागा या महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहाटेच्या पहिल्या लोकलपासून ते रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंतच्या महिला प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे महिलांची सुरक्षा लक्षात घेता, टॉकबॅक यंत्रणा बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्वेक्षणाअंती निर्णय

रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने रेल्वेच्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले. खाकी गणवेशात रेल्वे पोलस तैनात करण्याची पारंपरिक पद्धत बदलून सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा लागू करून आधुनिक सुरक्षेची गरज असल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे 59 टक्के महिला प्रवाशांनी व्यक्त केले. म्हणूनच लोकल ट्रेनमध्ये महिलांवरील विनयभंग आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, रेल्वे बोर्डाने सीसीटीव्ही वाढवण्याचा तसंच टॉकबॅक यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

594 महिला डब्यात टॉकबॅक यंत्रणा

आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तत्काळ मदत मिळावी यासाठी लोकलच्या गार्डशी संवाद साधता यावा, या उद्देशाने टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. लोकलमध्ये 594 मिहला डब्यात प्रमाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. 30 जूनअखेर सर्व महिला डब्यांत यंत्रणा सुरू होणार. तसंच, यंत्रणेतील बटण दाबल्यानंतर गार्डशी संवाद साधून योग्य ती मदत महिला प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. यामुळे संकटकाळात महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

अशी आहे यंत्रणा

मध्य रेल्वेच्या प्रशासकीय संचालकांनी सांगितलं की, मुंबई आणि उपनगरातील 117 रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. प्ल‌ॅटफॉर्मच्या दोन्ही दिशांना एक-एक अशी दोन प‌‌ॅनिक बटणं असतील. विशेषत: महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या डब्यासमोरच पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे.

पॅनिक बटण दाबताच अलार्म वाजेल. यासोबतच लाल दिवा पेटताच रेल्वे सुरक्षा दल (RPF) नियंत्रण कक्ष सतर्क राहणार आहे. प्लॅटफॉर्मवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणेमुळे संकटात सापडलेल्या प्रवाशाला सहज टिपू शकेल आणि तातडीने मदत मिळेल.

(हेही वाचा: Mumbai Heat Wave: काळजी घ्या! विकेंडला उकाडा वाढणार, मुंबईकर घामाघूम)


Edited By- Prajakta Parab 

First Published on: April 24, 2024 6:31 PM
Exit mobile version