घरमुंबईHarbour Railway : हार्बर मार्गावरील वाहतूक जवळपास अडीच तासांनी सुरळीत

Harbour Railway : हार्बर मार्गावरील वाहतूक जवळपास अडीच तासांनी सुरळीत

Subscribe

हार्बर मार्गावरील वाहतूक अडीच तासांनी सुरळीत झाली.

मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरील वाहतूक सीएसएमटी ते वडाळा दरम्यान डबा घसरल्याने 11.35 मिनिटांनी बंद पडली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ हार्बर लाईनवरील पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलचा एक डब घसरला होता. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान दोन्ही बाजूने वाहतूक बंद होती. मात्र आता जवळपास अडीच तासांनी हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक दोनवर पनवेल लोकलचा एक डबा 11.35 मिनिटांनी घसरला. यामुळे हार्बर लाईनवरील अप आणि डाऊन मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा या दरम्यानची वाहतूक बंद होती. सुरुवातीला हार्बर लाईनवरील काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या गाड्या मशीद बंदर स्थानकापर्यंत जात होता. मात्र डबा रुळावरून घसरल्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. प्रवाशांना रखरखत्या उन्हात ट्रॅकवर उतरून प्रवास करावा लागला. मात्र यादरम्यान, हार्बरच्या मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.

- Advertisement -

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ डबा बाजूला काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास अडीच तासांनी हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली, मात्र तोपर्यंत प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रुळावरून घसरलेला डबा दुपारी 01.15 वाजता रुळावर आणण्यात आला आणि 01.55 मिनिटांनी वाहतूत पूर्वपदावर आली. मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा डबा नेमका कसा घसरला, त्याचे कारण काय हे नंतर चौकशीतून समोर येईल.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -