रुळावर पडलेल्या जखमी प्रवाशासाठी मोटरमन बनला देवदूत

रुळावर पडलेल्या जखमी प्रवाशासाठी मोटरमन बनला देवदूत

लोकल ट्रेनच्या मोटरमनने धावती ट्रेन थांबवून जखमी प्रवाशाचे प्राण वाचवले.

रेल्वे रुळांवर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुण प्रवाशाला वाचविण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटरमन संजय चौधरी यांनी धावती लोकल थांबवून जखमी प्रवाशाला तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्या जखमी तरुणाचा जीव वाचला. मोटरमन संजय चौधरी प्रसंगावधनाबद्दल मध्य रेल्वेमध्ये त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. मंगळवारी सकाळी मोटरमन संजय चौधरी हे कल्याण ते सीएसएमटी मार्गावर लोकल चालवत होते. सकाळी १०.३० वाजता कुर्ला-घाटकोपर स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर एक तरुण रक्त मागाहून बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. त्यावेळी चौधरी यांनी आपल्या लोकलगाडीचे ब्रेक लावून गाडी थांबवली आणि लोकलमधून खाली उतरत या प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली.

जखमी प्रवाशी सध्या उपचार घेत आहे.
हे वाचा – धक्कादायक! आत्म्यांचे व्हिडिओ पाहून मुलीची आत्महत्या?

यावेळी त्यांच्यासोबत ट्रेन गार्ड देखील होते. या दोघांनी प्रवाशांच्या मदतीने त्यांना ट्रेनमध्ये नेले. तसेच पुढील कुर्ला स्थानकाशी संपर्क साधून रुग्णवाहिका तयार ठेवण्यास सांगितले. कुर्ला स्थानकात पोहोचताच रेल्वे पोलिसांच्या मदतीने या प्रवाशाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुण प्रवाशांचे नाव उमर फारुख जुबेद अहमद शेख आहे. त्याची प्रकृती आता सामान्य असल्याचे बोलण्यात येत आहे. त्याला आता राजावाडी हॉस्पिटलमधून साय हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुण काही कामानिमित्त लोकलने जात होता. मात्र लोकलमधून तो कसा पडला? याची माहिती अद्यापही मिळालेली नाही. मात्र मोटरमन संजय चौधरी यांच्या सतर्कतेमुळे या प्रवाशाचा जीव वाचला. त्यामुळे जखमी प्रवाशाच्या कुटूंबियांनी याचे आभार मानले आहे.


 

हे देखील वाचा – गुजरातमध्ये मांज्यामुळे ६ जणांचा मृत्यू; ५०० जखमी
First Published on: January 15, 2019 5:59 PM
Exit mobile version