सावधान! सरकत्या जिन्यावरुन प्रवास करताय; तुमच्यासोबतही ‘हे’ होऊ शकत

सावधान! सरकत्या जिन्यावरुन प्रवास करताय; तुमच्यासोबतही ‘हे’ होऊ शकत

सावधान! सरकत्या जिन्यावरुन प्रवास करताय

उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसुविधेकरता अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात आले आहे आहेत. मात्र, हे सरकते जिने कधी बंद असतात तर बऱ्याचदा त्यात बिघाड झालेला असतो. अशीच एक घटना अंधेरी स्थानकात घडली. सरकता जिना अचानक उलटा फिरल्याने प्रवाशांची एक घाबरगुंडी उडाली. या घटनेमध्ये एक प्रवासी जखमी देखील झाल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर १७ सरकत्या जिन्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

नेमके काय घडले?

अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरुन एका प्रवासी वरच्या दिशेने जात होता. मात्र, अचानक वर जाणारे जिने खालच्या दिशेने येऊ लागले. त्यामुळे गडबडून गेलेल्या प्रवाशाचा अचानक तोल गेला आणि त्यात तो जखमी झाला. तात्काळ त्याला स्थानकावर असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्रामध्ये उपचार करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

१७ जिन्यांची दुरुस्ती

या घटनेबाबत विचारणा केली असता, ब्रेक यंत्रणेत बिघाड किंवा मोटर कपलिंग यंत्रणा फेल होऊन सरकत्या जिन्याची मोटर उलट दिशेने फिरली. त्यानंतर या स्वयंचलित जिन्याच्या अन्य यंत्रणा कार्यान्वित झाल्याने सरकता जिना आपोआप बंद झाल्याचेही पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. या घटनेनंतर अशा तंत्राच्या १७ सरकत्या जिन्यांची दुरुस्ती तातडीने करुन मोटर बदलण्याचा निर्णय घेतल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंर्पक अधिकारी रवींद्र भासकर यांनी सांगितले.


हेही वाचा – करोना व्हायरस : वुहानमध्ये रुग्णालयाच्या संचालकाचा मृत्यू


 

First Published on: February 19, 2020 8:44 AM
Exit mobile version