Corona Vaccination: महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कोरोनाची लस; जनतेला केली ‘ही’ विनंती

Corona Vaccination: महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कोरोनाची लस; जनतेला केली ‘ही’ विनंती

Corona Vaccination: महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कोरोनाची लस; जनतेला केली 'ही' विनंती

देशात सध्या कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते कोरोनाची लस घेताना दिसत आहे. मुंबईत देखील १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना लस घेतली आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज कोरोनाच्या लसीचा पहिला डोस डोचून घेतला आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो कोविड लसीकरण केंद्रात जाऊन किशोरी पेडणेकर यांनी लस घेतली. सगळ्या लसीकरणात नोंदणी करून लस अवश्य टोचून घ्यावी, अशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जनतेला विनंती केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीत विकसित झालेली ‘कोविशील्ड’ लस किशोरी पेडणेकर यांनी घेतली आहे.

 

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काल १ हजार १२१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २८ हजार ७४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४८३ जणांचा मृत्यू झाला असून ३ लाख ६ हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत १० हजार १० रुग्णांवर उपचार सुरू आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. २ मार्चपर्यंत मुंबईत ३३ लाख ३१ हजार ९४२ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून मुंबईतील कोरोना दुप्पटीचा रेट २३५ दिवस आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना लसीचा घेतला पहिला डोस


 

First Published on: March 4, 2021 11:39 AM
Exit mobile version