दोन दिवसांत मुंबईतील परिस्थिती पूर्ववत होईल – किशोरी पेडणेकर

दोन दिवसांत मुंबईतील परिस्थिती पूर्ववत होईल – किशोरी पेडणेकर

‘भाभा, शताब्दी, भगवती आणि अग्रवाल या चार रुग्णालयातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनकरता वांद्रे येथील जम्बो रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन ऑक्सिजनची कमतरता कशी भरुन काढता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर वांद्रे येथील भाभा रुग्णालयाला ४० सिलेंडर, कुर्ला येथील भाभा रुग्णालयाला ७० सिलेंडर, शताब्दी रुग्णालयाला ६ सिलेंडर, अग्रवालला २५ आणि ट्रोमा केअर सेंटरला ८ सिलेंडर देण्यात आले आहेत. तसेच ज्याठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी लिक्विड प्लँट उभे करण्यात आले आहेत. तसेच पुढील दोन दिवसांत मुंबईतील परिस्थिती पूर्ववत होईल. मात्र, तोपर्यंत आपण बाटला सिलेंडरवर उपचार करत आहोत. तर सध्याची स्थिती ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात असल्याची माहिती’, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजनला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतील ऑक्सिजनची परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी एक दिवस पूरेसा आहे. त्यामुळे आता लिक्विड ऑक्सिजनमुळे एकावेळी आठ ते दहा जणांना ऑक्सिजनचा पुरवठा सहजरित्या होऊ शकेल. तसेच खासगी रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी वेगळे वेंडर असतात. त्यामुळे आरोग्यमंत्री त्यांच्याशी देखील याबाबत बोलत आहेत’.

रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात नाही

अंधेरीच्या एक्सीस रुग्णालयात एका रुग्णाला ऑक्सिजन साठा नसल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यास सांगितले, असल्याचे समोर आले आहे. यावर मुंबईच्या महापौरांनी ‘आपण आपल्या रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला जर ऑक्सिजन मिळत नसेल तर त्याला आपण तात्काळ जम्बो कोविड रुग्णालयात दाखल करतो. मात्र, अशा तक्रारी दररोज चार ते पाच येतात. मात्र, ज्याठिकाणी ऑक्सिजनची खरच गरज असते, त्या रुग्णांना हलवण्यात येते. त्यामुळे कुठल्याही रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात नाही’, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली आहे.


हेही वाचा – रेमडेसिवीरचे राजकारण


 

First Published on: April 18, 2021 1:10 PM
Exit mobile version