Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश रेमडेसिवीरचे राजकारण

रेमडेसिवीरचे राजकारण

देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामधील राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणिअल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याबद्दल केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ नये अन्यथा कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी इंजेक्शन तयार करणार्‍या कंपन्यांना केंद्राकडून देण्यात आल्याचा आरोप नबाव मलिक यांनी केलाय. मात्र या आरोपांनाकेंद्रीय मंत्री मनसुख मंडावीय यांनी प्रत्यूत्तर देताना हे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी –नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्यांना दिल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी आधी ट्विट करून आणि नंतर माध्यमांसमोर येऊन हा आरोप केला आहे. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाही.

केंद्र सरकार त्यास नकार देत आहेत, असा मुद्दा मलिक यांनी मांडला आहे. राज्य सरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची आम्हाला धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

साठा जप्त करणाचा इशारा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मालिकांनी पुरावे द्यावेत- दरेकर
नवाब मलिक यांचे हे आरोप म्हणजे राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. असे आरोप करताना मलिक यांनी आधी पुरावे द्यायला हवेत अन्यथा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राला हरप्रकारे मदत – केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीयांचे उत्तर

नवाब मलिकांचे आरोपआरोप अर्धसत्य आणि खोटे आहेत. ते खर्‍या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ आहेत. केंद्रसरकार महाराष्ट्राच्या अधिकार्‍यांच्या सतत संपर्कात आहे आणि रेमडेसिविर पुरवण्यासाठी हरएक प्रकारे मदत करत आहे. देशातील उत्पादन दुप्पटीनं वाढवण्यासाठी १२ एप्रिल २०२१ पासून २० हून अधिक प्लान्टला तातडीनं परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुरेसा रिमडेसिविर पुरवठा करणं याला आम्ही प्राधान्य दिलंय’ असे मंडावीय यांनी म्हटलंय.’आम्ही रेमडेसिविर बनवणार्‍या सर्व उत्पादकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निर्यातदारांकडे कोणताही माल अडकून पडलेला नाही. परंतु, तुमच्याकडे १६ कंपन्यांची असलेली यादी द्या. आमचं सरकार नागरिकांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे’, याकडे मंडावीय यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -