आता मेट्रोचा अनलिमिटेड प्रवास फक्त २५ रुपयांच्या टॉप अपमध्ये!

आता मेट्रोचा अनलिमिटेड प्रवास फक्त २५ रुपयांच्या टॉप अपमध्ये!

Mumbai Metro : मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मेट्रोचा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना उद्यापासून म्हणजेच २३ जानेवारीपासून अनलिमिटेड पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्याच्या ४५ दिवसांच्या पासमध्ये अतिरिक्त २५ रूपये मोजून हा अनलिमिटेड पास वापरता येईल. याआधी प्रवाशांना एका पासमध्ये दीड महिन्यात म्हणजेच ४५ दिवसांमध्ये ४५ ट्रिपचाच लाभ घेता येत होता. दोनदा मेट्रो प्रवास केला, तर दोन ट्रीप पासमधून वजा होत होती. मात्र आता मेट्रोने ‘जास्त प्रवास करा, जास्त बचत करा’ ही घोषणा केली आहे. मात्र, हा अनलिमेटेड पास अहस्तांतरणीय असेल. अनलिमिटेड पाससाठी ग्राहकांना मेट्रोकडून नवीन स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.

अनलिमिटेड पासमुळे कुठेही प्रवास शक्य!

मेट्रोने दररोज प्रवास करणारे असे ४.५ लाख प्रवासी आहेत. त्यापैकी १ लाख प्रवासी हे ट्रीप पासधारक आहेत. तर स्टोअर व्हॅल्यु पासहोल्डर्सची संख्या दीड लाख आहे. तर दोन लाख प्रवासी हे टोकन वापरून प्रवास करतात. मेट्रो मार्गावर सध्या महिन्यापोटी सरासरी १.२ कोटी प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या नव्या सुविधेमुळे नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी फायदा होणार आहे. या अनलिमिटेड पासमुळे कुठेही उतरून कुठेही प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. ग्राहकांची मागणी असल्यामुळे हा बदल केला आहे, असे एमएमओपीएलकडून सांगण्यात आले आहे. हे बदल उद्यापासून अंमलात येणार आहेत.

असे आहेत नवे दर!

स्टेशन – अंधेरी ते साकीनाका
जुना दर – ७७५
नवा दर – ८००

स्टेशन – घाटकोपर ते मरोळ नाका
जुना दर – ७७५
नवा दर – ८००

स्टेशन – घाटकोपर ते अंधेरी
जुना दर – ११००
नवा दर – ११२५

स्टेशन – वर्सोवा ते घाटकोपर
जुना दर – १३७५
नवा दर – १४००

First Published on: January 22, 2020 8:13 PM
Exit mobile version