Mumbai News : आला उन्हाळा मुंबईकरांनो तब्येत सांभाळा; महापालिका आरोग्य यंत्रणा सज्ज

Mumbai News : आला उन्हाळा मुंबईकरांनो तब्येत सांभाळा; महापालिका आरोग्य यंत्रणा सज्ज

मुंबई : मुंबईत सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो कडक उन्हात घराबाहेर कामासाठी जाणे टाळायला पाहिजे. मात्र मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. उन्हाळ्यात नागरिकांना जास्त त्रास जाणवल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात तत्काळ उपचार देण्यासाठी के.ई.एम., सायन, नायर, कूपर व कस्तुरबा रुग्णालयात खास सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उष्मघाताने बाधित रुग्णांवर त्वरित उपचार होण्यासाठी रुग्णालयात ” कोल्ड रूम’ ची सुविधा करण्यात यावी. तसेच किमान दोन बेड आणि अधिक आवश्यकता भासल्यास त्यानुसार अधिक बेडची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Mumbai News Mumbaikars take care of their health this summer Municipal health system ready)

मुंबईत ऋतूमानानुसार हिवाळा संपला आहे. आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दरदरून घाम फुटू लागला आहे. मात्र अनेकांना कडक उन्हाळा सहन होत नाही. या उन्हाचे त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होतात. त्यामुळे त्यांना आजारपण येते. मात्र उन्हाळयात आवश्यक ती योग्य काळजी घेतली अथवा आवश्यक त्या उपाययोजना केल्यास त्या व्यक्तीची प्रकृती बिघडत नाही अथवा उन्हाळ्याचा सहजपणे मुकाबला करणे शक्य होते.

हेही वाचा – Maharashtra Politics : वसंत मोरे- प्रकाश आंबेडकर भेटीने राज्यात नवे राजकीय समीकरण?

सर्वसाधारणपणे मार्च महिन्यापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमानामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) असून त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. वातावरणाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते तोपर्यंत मानवाला त्याचा काही त्रास होत नाही. त्यानंतर मात्र त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात.

मुंबईं महापालिका आरोग्य विभागाने कडक उन्हाळा असल्यास कोणती काळजी घ्यावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शनपर माहिती दिली आहे. त्यानुसार उन्हाळ्यात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा – Raut VS Ambedkar : आंबेडकरांना माझ्यावर खापर फोडू द्या; वंचितच्या नाराजीवर राऊतांची भूमिका

उष्माघाताची कारणे

  1. घराबाहेर जास्त वेळ काम करणे किंवा उन्हाळ्यात इतर मजुरीची कामे करणे
  2. कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काचेच्या कारखान्यात काम करणे
  3. उच्च तापमान खोलीत काम
  4. उष्माघात हा थेट उष्णतेच्या सतत संपर्कामुळे किंवा वाढलेल्या तापमानाच्या परिस्थितीमुळे होतो, जसे की घट्ट कपडे घालणे

लक्षणे

  1. थकवा, ताप, कोरडी त्वचा
  2. भूक न लागणे, चक्कर येणे, नैराश्य, डोकेदुखी
  3. रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता आणि अस्वस्थता, वेशुद्धी इ.

उपचार

  1. रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, पंखे, कुलर खोलीत अथवा एसी खोलीमध्ये ठेवावे
  2. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
  3. रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घाला
  4. रुग्णाच्या कपाळावर थंड पाणी ठेवावे, बर्फाचा पॅक लावावा
  5. आवश्यकतेनुसार इंट्राव्हेनस सलाईन द्या.

हेही वाचा – Sharad Pawar : प्रफुल्ल पटेलांना घोटाळ्याप्रकरणी क्लीनचीट मिळाल्यावर शरद पवारांचा भाजपावर निशाणा

उष्णताविकार, लक्षणे आणि प्रथमोपचार

हे करावे

पुरेसे पाणी प्यावे. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे , सैलसर कपडे वापरणे. घराबाहेर कामासाठी गेल्यास उन्हाच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी डोळ्यावर गॉगल व डोक्यावर टोपी घाला. तसेच, डोक्यावर छत्री घ्या. पादत्राणे वापरणे. घरात पाळीव प्राणी असल्यास त्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवावे. ओलसर पडदे, कुलर, पंखा यांच्या मदतीने घर थंड ठेवणे.

हे करू नये

शक्यतो कडक उन्हात घराच्या बाहेर जाणे टाळावे. अंगमेहनतीची कामे कडक उन्हात करणे टाळावे. आपले वाहन उन्हात पार्क करू नका आणि त्या वाहनात आपल्या मुलांना बसवून ठेवू नका. तसेच, अंगावर गडद रंगाचे , तंग कपडे वापरू नयेत. उन्हाळ्यात चहा, कॉफी, मद्य, सॉफ्टड्रिंक घेणे टाळावे. खूप प्रथिने युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.

First Published on: March 29, 2024 11:22 PM
Exit mobile version