मोठी कारवाई! सायनमधून २१ कोटींची हेरॉईन जप्त; एक महिला ड्रग्ज पेडलर गजाआड

मोठी कारवाई! सायनमधून २१ कोटींची हेरॉईन जप्त; एक महिला ड्रग्ज पेडलर गजाआड

ठाण्यात साडेचार लाखांचा हेरॉईन जप्त, एकाला अटक; गुन्हे शाखेचे कारवाई

मागील वर्षापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (NCB) ड्रग्ज पेडलर विरोधात धडक मोहीम सुरू आहे. मुंबईत ठिकठिकाणी छापा टाकून एनसीबी मोठ्या प्रमाणात ट्रक्स जप्त करत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सायन परिसरात काल, मंगळवारी रात्री मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सायनमधून तब्बल २१ कोटींची हेरॉईन जप्त केली असून यामध्ये एका महिला ड्रग्ज पेडलरला गजाआड करण्यात आले आहे.

काल, मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी घाटकोपर पथकाने सायन परिसरात छापा टाकला. यावेळी सायन परिसरातून ड्रग्ज पेडलर महिलेकडून ७ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची किंमत जवळपास २१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पथकाने ही कारवाई केली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती मुंबई पोलिसांकडून आज दुपारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान २ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने मुंबईहून गोव्या जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक जणांना अटक करण्यात आली. आज याप्रकरणातील अटकेत असलेल्या आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. गेल्या १७ दिवसांपासून आर्यन खान जेलमध्ये आहे. त्यामुळे आज आर्यन खानला बेल मिळणार की पुन्हा जेल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.


हेही वाचा – नोटीसा आलेल्या साखर कारखान्यांवर कारवाई नाही!


 

First Published on: October 20, 2021 8:15 AM
Exit mobile version