Mumbai Police : मुंबईत आता वाहने उचलून नेता येणार नाही, पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा वाहनधारकांना दिलासा

Mumbai Police :  मुंबईत आता वाहने उचलून नेता येणार नाही, पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा वाहनधारकांना दिलासा

Passport Verification आता पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही, पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा

मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. मुंबईत ट्राफिक आणि पार्किंगची मोठी समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहनधारकांचा पार्किंग करताना मोठा खोळंबा होतो त्यामुळे अनेकवेळा नो पार्किंगमध्ये वाहने लावली जातात आणि त्यानंतर त्यावर मुंबई वाहतूक पोलीस कारवाई करत वाहने टो करुन उचलून नेतात. मात्र मुंबईकरांच्या या समस्येवर मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांनी संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेत मुंबईत आता प्रायोगिक तत्त्वावर वाहने उचलून न नेण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय पांडे यांनी ट्विट करत मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी दिलीय सोबतच सर्वांनी नियमांचे पालन करावे असा सल्ला देखील दिला आहे. संजय पांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, प्रिय मुंबईकरांनो आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वात आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवित आहोत. सर्वांनी नियमांचे पालन केले तर प्रयोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाल काय वाटते ते मला नक्की कळवा.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार हाती घेताच मुंबईकरांना खुश केले आहे. मात्र ही आनंदाची बातमी देत त्यांनी नियम पाळण्याचे आवाहन देखील केले आहे. म्हणजेच सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळले तर प्रयोगिक तत्त्वार घेण्यात आलेला हा निर्णय नियमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस आयुक्त म्हणून रूजू होताच मुंबईकर जनतेस खुले पत्र लिहीत मुंबईकरांना त्यांच्या तक्रारी सांगण्याचे आवाहन करत स्वत:चा खाजगी नंबर देखील शेअर केला. पोलीस आयुक्तांचे मुंबईकरांना खुले पत्र


हेही वाचा – Mumbai Dabbawala Bhavan : मुंबईतील डब्बेवाला भवनाचे मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते उद्घाटन

First Published on: March 6, 2022 8:34 PM
Exit mobile version