घरमहाराष्ट्रपोलीस आयुक्तांचे मुंबईकरांना खुले पत्र

पोलीस आयुक्तांचे मुंबईकरांना खुले पत्र

Subscribe

तक्रार करण्यासाठी दिला खासगी मोबाईल नंबर

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांना खुले पत्र लिहीत काही तक्रार असल्यास थेट संपर्क साधण्याचे मुंबईकरांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी चक्क आपला खासगी मोबाईल नंबर दिला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत अकाऊंटवरून हे पत्र ट्वीट करण्यात आले आहे.

संजय पांडे यांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले आहेत की, मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास 30 वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वतःची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. ही बाब माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाची आहे.

- Advertisement -

या कठीण काळात आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मला 9869702747 या क्रमांकावर जरूर कळवा. अनेकवेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -