Cruise Drugs Case: समीर वानखेडेंवरील आरोपांची चौकशी मुंबई पोलिस करणार, ACP अधिकारी नेमला

Cruise Drugs Case: समीर वानखेडेंवरील आरोपांची चौकशी मुंबई पोलिस करणार, ACP अधिकारी नेमला

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून खळबळ माजली आहे. आता याप्रकरणात मुंबई पोलिसांनी एंट्री घेतली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणासंदर्भात समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. तसेच एनसीबी विरोधात काही तक्रारी मुंबई पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. या सगळ्याची चौकशी आता मुंबई पोलीस करणार आहेत. एसीपी दर्जाचे अधिकारी याप्रकरणाची चौकशी करणार असून याच दरम्यान समीर वानखेडे यांची देखील चौकशी केली जाणार असल्याचे समोर आले आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. याच आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाचा अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यामध्ये एनसीबीच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारींची देखील चौकशी अधिकारी करणार आहेत. आतापर्यंत अशा तक्रारी मुंबईतील चार पोलीस ठाण्यांमध्ये आल्या आहेत.

माहितीनुसार आतापर्यंत नवाब मलिक आणि एनसीबीच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे एकूण ६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामधील मलिकांविरोधात २ तक्रारी असून उर्वरित ४ तक्रारी एनसीबी विरोधातील मुंबई पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत.

दरम्यान काल, मंगळवारी समीर वानखेडे यांची दिल्लीत चौकशी पार पडली. त्यानंतर ते काल रात्रीच मुंबईत परतले आहेत. सध्या वानखेडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या एनसीबीचा पंच असलेल्या प्रभाकर साईलची एनसीबी चौकशी करत आहे. डीआयजी (उपमहासंचालक) ज्ञानेश्वर सिंह साईलची चौकशी करत आहेत.


हेही वाचा – Nawab Malik VS Sameer Wankhede: स्वीट कपल फोटोतून नवाब मलिकांनी जाहीर केला वानखेडेंचा ‘निकाहनामा’


 

First Published on: October 27, 2021 12:30 PM
Exit mobile version