Mumbai Rains : मुंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी

Mumbai Rains : मुंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी

Mumbai Rain : मुंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी

मुंबईत आज सकाळीपासून ढगाळ वातावरण पहायला मिळात आहे. आज सकाळीच मुंबईतील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत मागील १ तासापासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. त्याचप्रमाणे सायन, चेंबूर, कुर्ला,परेल,माहिम, दादर परिसरात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात सकाळीच तुरळक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.  मुंबईत आज सकाळपासूनच वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. येत्या २४ तासात रायगड,मुंबई, ठाणे आणि पालघर तसेच नाशिक,नगर,पुणे, सातारा येथे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र,कोकण,मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडात पाऊस होण्याची शक्यता आहे.

आज मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार,धुणे,नाशिक,अहमदनगर,पुणे,रायगड रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा एकूण १४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळपासूनच या जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे.

दक्षिण- पूर्व अरबी समुद्र,मालदीव,लक्षद्विपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे आणि तिथून पूर्व मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्र,मालदीव,लक्षद्विपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण शक्यता आहे त्यामुळे पुढील२-३ दिवस मुंबईसह राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासूनच मुंबई सह पुणे आणि रत्नागिरीतही पावसाने हजेरी लावली आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: देशातील लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर; ४ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

First Published on: December 1, 2021 8:48 AM
Exit mobile version