‘महापालिकाच नाही तर जगातील कोणतीही यंत्रणा पावसासमोर हतबल होईल’

‘महापालिकाच नाही तर जगातील कोणतीही यंत्रणा पावसासमोर हतबल होईल’

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

मुंबईतील पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे. महापालिकेची यंत्रणा नाही जर जगातील कोणतीही यंत्रणा अशा पावसासमोर हतबल होईल हे सत्य आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. महापालिका यंत्रणा आणि व्यवस्थापन कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. ही आपत्कालीन परिस्थिती आहे यासाठी पालिकेला दोष देऊन चालणार नाही‘, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपत्कालीन विभागाला भेट देऊन मुंबईतील पावसाचा आढावा घेतला त्यावेळी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे

पावसाने मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला झोडपून काढले. यामुळे मुंबईला याचा मोठा फटका बसला आहे. तसेच मुंबईत बऱ्याच ठिकाणी खोदकाम सुरु आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये आणि खोदकाम केलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईकरांची लाईफलाईन सकाळपासून ठप्प झाली आहे. तसा मी ही पावसामुळे अडकलो. विविध ठिकाणी एका रात्रीत ४०० मिमी पेक्षा अधिक पाऊस लागल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे‘. तसेच आवश्यक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आदित्य ठाकरेंनी यावेळी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियातही अशाप्रकारे पुरपरिस्थिती आल्यास सर्व व्यवस्था फोल ठरते, अस उदाहरण देखील त्यांनी यावेळी दिले.


हेही वाचा – पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प; बाहेरगावच्या रेल्वे रद्द

हेही वाचा – सावधान ! मुंबईत पावसाचा रेड अलर्ट; पुढील ६ दिवस धोक्याचे


 

First Published on: July 2, 2019 3:11 PM
Exit mobile version