ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर साचले पावसाचे पाणी

ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर साचले पावसाचे पाणी

ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर साचले पावसाचे पाणी

मुंबई आणि उपनगर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये मार्च महिन्यापासून राज्यात, देशात लॉकडाऊन असल्याने रेल्वेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारे नाल्यांची सफाईच पूर्ण झाली नसल्याचे दिसून आले. या कारणाने ठाणे स्थानक येथे रूळ पावसाच्या पाण्याखाली शनिवारी गेल्याचे बघायला मिळाले. पण संथ गतीने अत्यावश्यक लोकल वाहतूक सुरू असल्याने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकल नियमित वेळेत न मिळता उशिरा मिळाल्यात. यामुळे घरी परतण्याच्या वेळी अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांचे हाल झाले.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवाशांमध्ये सुमारे ७० हजार कर्मचारी लोकलने प्रवास करत आहेत. तसेच सकाळच्या वेळी इतर प्रवासी देखील लोकल प्रवास करत आहेत. दरवर्षी रेल्वेतर्फे रुळांच्या बाजूचे नाले साफ करण्यात येतात. पण यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने रेल्वेच्या ठेकेदारांनी कामगार कमी प्रमाणात मिळत असल्याने नाले सफाई दिखाऊ साफसफाई केल्याचे उघड झाले. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी तुंबल्याने रूळ पाण्याखाली गेले होते.

यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून तब्बल वीस मिनिटे अत्यावश्यक सेवेकरिता सुरू असलेली लोकल उशिरा धावत होती. यामुळे संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळी लोकल प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.


मुंबईत पावसाची रिपरिप सुरू; अलर्ट मात्र टळला
First Published on: July 4, 2020 8:04 PM
Exit mobile version