मुंबईमध्ये कोरोनाचे ४१७ नवे रुग्ण; बाधितांची संख्या ६ हजार ८७४ वर

मुंबईमध्ये कोरोनाचे ४१७ नवे रुग्ण; बाधितांची संख्या ६ हजार ८७४ वर

मुंबईत गुरुवारी तब्बल ४१७ रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार ८७४ वर पोहचला आहे. त्याचप्रमाणे २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २९० वर पोहचला आहे.

कोरोनाबाधित २० रुग्णांचा मृत्यू

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ गुरुवारीही कायम राहिली. कोरोनाची संख्या वाढत असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास बाहेर पडत असल्याने मुंबईतील कोरोनाचा विस्फोट रोखणे अवघड असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये ४१७ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार ८७४ वर पोहचला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये २७ आणि २८ एप्रिलदरम्यान कोरोना चाचणी केलेल्या ११० जणांचा अहवाल गुरुवारी आल्याने त्याचा यात समावेश केला आहे. तसेच मुंबईमध्ये २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २९० वर पोचली आहे. २० मृत झालेल्या व्यक्तींपैकी १६ जण हे दीर्घकाळ आजारी होते. यामध्ये १४ पुरुष तर ६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ८ जण हे ६० वर्षांवरील तर १२ जण हे ४० ते ६० च्या दरम्यान आहेत.

मुंबईत कोरोनाचे ४९८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ३० वर पोहचली आहे. तसेच ४५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १ हजार ४७२ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.


हेही वाचा – ट्रकमधून प्रवास करणारे 37 परप्रांतीय कामगार ताब्यात


First Published on: April 30, 2020 11:45 PM
Exit mobile version