मुंबईत ५ दिवस १० टक्के पाणीकपात – महापालिका

मुंबईत ५ दिवस १० टक्के पाणीकपात – महापालिका

18 मे पासून आता पुणे शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे बंधाऱ्यावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीचे दुरुस्तीचे काम सोमवार, दिनांक १७ मे २०२१ ते शुक्रवार, दिनांक २१ मे २०२१ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने प्रकाशित केली आहे. त्यामुळे या पाच दिवसांमध्ये मुंबईकरांना पाणी कमी कबी दाबाने आणि कमी कालावधीसाठी मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेनेही या कालावधीत नागरिकांना अलर्ट करण्यासाठी ही सूचना जारी केली आहे.

या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये सोमवार, दिनांक १७ मे २०२१ ते शुक्रवार, दिनांक २१ मे २०२१ या कालावधीत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.


 

First Published on: May 11, 2021 7:31 PM
Exit mobile version