CoronaVirus: मुंबई विद्यापीठाला लॉकडाऊनमध्ये अंतरिम उन्हाळी सुट्टी

CoronaVirus: मुंबई विद्यापीठाला लॉकडाऊनमध्ये अंतरिम उन्हाळी सुट्टी

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत विद्यापीठाशी संलग्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु विद्यापीठाने अचानक परिपत्रक जारी करत १४ एप्रिलपर्यंत अंतरिम उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या या परिपत्रकाला प्राध्यापक संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे.

राज्य सरकारने यापूर्वी ३० मार्चपर्यंत महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या. परंतु घरातून काम करण्यातून काहीच सध्या होत नसल्याने अखेर मुंबई विद्यापीठ प्रशासनाने १ ते १४ एप्रिलदरम्यान अंतरिम उन्हाळी सुट्टी जाहीर केली. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना पाठवले आहे.

या सुट्टीच्या काळात सरकारकडून अत्यावश्यक सेवेसाठी बोलवण्यात आल्यास कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागेल. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याचे नमूद केले आहे. याला प्राध्यापकांच्या मुक्ता संघटनेने विरोध दर्शवला आहे. शिक्षक संघटनांना विचारात न घेता विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून याला विरोध असल्याचे पत्र संघटनेने मुंबई विद्यापीठाला पाठवले आहे.


हेही वाचा –  पहिली ते आठवीचे विद्यार्थी जाणार पुढील वर्गात; सीबीएसई मंडळाचा निर्णय


 

First Published on: April 2, 2020 3:39 PM
Exit mobile version