‘मुंबई विद्यापीठ’ चॅम्पिअनशिप ट्रॉफीचे मानकरी!

‘मुंबई विद्यापीठ’ चॅम्पिअनशिप ट्रॉफीचे मानकरी!

मुंबई विद्यापीठ २२ व्या क्रीडा महोत्सवाचे मानकरी

मुंबई विद्यापीठामध्ये १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान २२ व्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज, सोमवारी हे क्रीडा महोत्सव संपन्न झाले. मुंबई विद्यापीठाने निर्विवाद वर्चस्व मिळवत ३५० गुणांसह प्रथम क्रमांक पटकावलाआहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सलग तीन वेळा मुंबई विद्यापीठाने अजिंक्यपद पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या क्रीडा महोत्सवाच्या समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आले.

विविध खेळांचा समावेश 

पाच दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात अनेक खेळ खेळण्यात आले. त्यामध्ये कबड्डी (पुरुष व महिला), खो-खो (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), मार्ग व मैदानी स्पर्धा (पुरुष व महिला) या एकूण पाच प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. या विविध क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने यश संपादन केले आहे. या बाबतची माहिती जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव डॉ. लीलाधर बन्सोड यांनी दिली.

मुंबई विद्यापीठाचे स्पर्धेत स्थान

चॅम्पिअनशिप ट्रॉफीचे मानकरी

जनरल चॅम्पिअनशिप टीम इव्हेन्ट रोटॅटिंग ट्रॉफी पुरुष गटातून १९० गुण मिळवून आणि महिला गटातून १६० गुण मिळवून मुंबई विद्यापीठाने एकूण ३५० गुणांची कमाई करत चॅम्पिअनशिप ट्रॉफीचे मानकरी ठरले आहेत. महिला गटातून कबड्डीसाठी उत्कृष्ट खेळाडू म्हणून मेघा कदम, खो-खो महिला गटातून रुपाली बढे, बास्केटबॉल महिला गटातून कॅरीना मॅनेझेस, खो-खो पुरुष गटातून निखिल वाघेला, बास्केटबॉल पुरुष गटातून विनायक गुंड, व्हॉलीबॉल
पुरुष गटातून आशुतोष भोर या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सत्कार करण्यात आला.

सोलापूर विद्यापीठाकडे ध्वज सुपूर्द

या क्रीडा महोत्सवात राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठातील १९७८ खेळाडूंसह २६४ प्रशिक्षक आणि व्यवस्थापक सहभागी झाली होते. २२ व्या क्रीडा महोत्सवाचा स्पर्धेचे यजमान पदाचा बहुमान मुंबई विद्यापीठाला मिळाला होता आणि २३ व्या आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे यजमानपद सोलापूर विद्यापीठाकडे क्रीडा महोत्सवाचा ध्वज देऊन सुपूर्द करण्यात आले.

First Published on: February 19, 2019 4:50 PM
Exit mobile version