मुंबईकरांची तहान महागली; पाणीपट्टीत झाली इतक्या टक्क्यांची वाढ

मुंबईकरांची तहान महागली; पाणीपट्टीत झाली इतक्या टक्क्यांची वाढ

महागाईने आधीच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्य, भाजीपाला, गॅस सिलिंडर, प्रवास भाड्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे जगणं दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे. अशात आता मुंबईकरांना वाढत्या पाणीपट्टीचा भार सहन करावा लागणार आहे. पालिकेने यावर्षी म्हणजे 2022 मध्ये एक हजार 7.21 टक्क्यांपर्यंत पाणीपट्टी वाढण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती आणि व्यावसायिकांना पाणीपट्टीतील दरवाढ लागू होणार आहे. पाणीपुरवठा खर्चात 10 ते 50 टक्क्यांनी वाढ झाल्याने ही पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे पुढील महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
(mumbai water became expensive increase of 7 12 percent in water rates)

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी असा सात तलावांमधून दरदिवसा 3850 दशलक्ष लीटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याला लाभ मिळणाऱ्या प्रकाराप्रमाणे पालिकेकडून प्रत्येकी एक हजार लिटरमागे पाणीपट्टी आकारली जाते. महापालिकेने 2012 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, दरवर्षी किमान 8 टक्के पाणीपट्टी वाढवता येते. मात्र 2020 मध्ये कोरोना महामारीच्या प्रभावामुळे पाठीपट्टी वाढवण्यात आली नाही. मात्र गेल्या वर्षी 2021 ला 5.29 टक्क्यांनी पाणीपट्टी वाढवण्यात आली आहे.

नव्या पाणीपट्टी वाढीनुसार, प्रति हजार लिटरमागे झोपडपट्टी विभागाची पाणीपट्टी 4.93 रुपयांवरून 5.28 रुपये होणार आहे. तर इमारतींची पाणीपट्टी 5.94 रुपयांवरून 6.36 रुपये होणार आहे. नॉन कमर्शिअल विभागाची पाणीपट्टी 23.77 रुपयांवरून 25.26 रुपये होणार आहे.

कमर्शिअल विभागात 44.58 रुपयांवरून 47.65 रुपये होणार आहे. उद्योग कारखान्यासाठी 59.42 रुपयांवरून 63.65 रुपये आणि रेसकोर्स व फाईव्ह स्टार हॉटेलसाठी 89.14 रुपयांवरून 95.49 इतकी पाणीपट्टी वाढणार आहे.


एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकरांची अडचण वाढणार?, सोमय्यांकडून पुन्हा इशारा

First Published on: October 30, 2022 8:12 AM
Exit mobile version