ऐन पावसाळ्यात मुंबईकरांची होतेय लाहीलाही!

ऐन पावसाळ्यात मुंबईकरांची होतेय लाहीलाही!

ऐन पावसाळ्यात मुंबईकरांची होतेय लाहीलाही!

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झोडपून काढल्यानंतर मुंबईतून गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. आठवड्याभरापासून तुरळक सरींनी कोसळणारा पाऊस गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देत आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात मुंबईकरांची अक्षरशः लाही लाही होतानाचे चित्र आहे.

दिवसातून पावसाची एखादीच सर काही मिनिटांसाठी बरसत असल्याने पावसाने मुंबईत तात्पुरता ‘ब्रेक’ घेतल्याचे चित्र सध्या मुंबईकर अनुभवत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जून आणि २८ जून या दोन दिवसांत पावसाने फारच जोर धरला होता. त्यामुळे, मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. पण, जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसात पडलेल्या पावसानंतर आता अजिबातच पाऊस पडत नाही अशीच प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करतात. मध्येच पाऊस गायब झाल्याने मुंबईकरांना आता दिवसा घामांच्या धारांना सामोरं जावं लागत आहे. तापमानात वाढलेली उष्णता आणि आर्द्रतेमुळे वातावरणात दमटपणा वाढला आहे. शिवाय, राज्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडत नसल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

हेही वाचा – डोंगरीतली ती इमारत म्हाडाचीच, प्रॉपर्टी कार्डवर नाव सापडलं!

यंदा जूनच्या शेवटपर्यंत पावसाने मुंबईत हजेरी लावली नाही. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस पडल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने मुंबईत दुपारच्या वेळेस उन्हाळी वातावरण अनुभवायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी सरासरी कमाल तापमान २९ अंश से. होते. तर, आर्द्रता ८२ टक्के होती.

First Published on: July 17, 2019 9:07 PM
Exit mobile version