सोशल मीडियावरील ‘हा’ मेसेज आहे Fake, महापालिकेने दिले स्पष्टीकरण

सोशल मीडियावरील ‘हा’ मेसेज आहे Fake, महापालिकेने दिले स्पष्टीकरण

राज्यात कोरोना दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला असून १५ मेच्या सकाळी ७ पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. पण याकाळात समाज माध्यमांवर अफवा पसरल्या जात आहे. अशी एक अफवा मुंबई महापालिकेच्या नावाने समाज माध्यमावर फिरत होती. ज्यामध्ये दुकानं सुरू ठेवण्याच्या वेळा आणि दिवस सांगण्यात आले होते. पण ही पोस्ट फेक असून याबाबतचे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने त्याच्या ट्वीटर अकाउंटवरून दिले आहे.

मुंबई महापालिकेने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून असे सांगितले आहे की, ‘समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली ही माहिती खोटी असून बृ.म.न.पा.ने असे कुठलेही नियम जाहीर केलेले नाहीत. राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वेच लागू आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका व त्या पसरवूही नका.’

दरम्यान गेल्या २४ तासांत मुंबईत ३ हजार ९२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६ हजार ३८० जण रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४८ हजार ६२४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार १६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ लाख ७२ हजार ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – मुंबईकरांसाठी १०० चायनीज व्हेंटिलेटरची खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी


 

First Published on: April 30, 2021 10:04 PM
Exit mobile version