मराठवाड्यातील ‘या’ आमदाराला मुंबईतील घर परवडेना; कुठून आणायचे ऐवढे पैसे म्हणत सोडली म्हाडाची सदनिका

मराठवाड्यातील ‘या’ आमदाराला मुंबईतील घर परवडेना; कुठून आणायचे ऐवढे पैसे म्हणत सोडली म्हाडाची सदनिका

Mumbbai Mhada lottery 2023 BJP MLA Narayan Kuche returned the houses of MHADA as they could not Afford it

मुंबई: जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचे मुंबईत आलिशान घर घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील घर म्हाडाच्या लॉटरीत कुचे यांना साडेसात कोटी रुपयांत मिळाले होते. या घराची अंदाजे किंमत दहा कोटींची होती. दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचं यंदाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वात महागडं घर होतं. विशेष म्हणजे हेच घर कुचे यांना म्हाडाच्या लॉटरीत लागलं होतं. पण आता हे आलिशान घर आमदार नारायण कुटे यांनी सोडलं आहे. (Mumbai Mhada lottery 2023 BJP MLA Narayan Kuche returned the houses of MHADA as they could not Afford it)

म्हाडा मुंबई मंडळाने 14 ऑगस्ट रोजी 4 हजार 85 घरांची लॉटरी काढली. यासाठी काही लोकप्रतिनिधींनीही आरक्षित प्रवर्गातून अर्ज केले होते. यामध्ये नारायण कुचे, भागवत कराड यांच्यासह काही आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समावेश होता. कुचे आणि कराड यांनी ताडदेवमधील क्रिसेन्ट टॉवर येथील साडेसात कोटी रुपये किमतीच्या घरासाठी अर्ज केला होता.

लोकप्रतिनिधी प्रवर्गात घर होतं एक, तर अर्ज आलेले दोन. लॉटरीत आमदार नारायण कुचे हे विजेते ठरले. तर कराड यांना प्रतीक्षा यादीत जावं लागलं. त्याचवेळी ताडदेवमधील साडेसात कोटींच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील घरासाठीही कुचे हे विजेते ठरले होते.

म्हाडाने ऑनलाईन स्वीकृती पत्र पाठवून घर घेणार की परत करणार, याची विचारणा केली. 27 ऑगस्टपर्यंत याचं उत्तर कळवणं आवश्यक आहे. आपण ताडदेवमधील दोन्ही घरं गुरुवारी परत केल्यांच कुचेंनी म्हाडाला कळवलं आहे. त्यामुळे आता भागवत कराड यांना संधी आहे. तसंच, घरं महाग असून ती सर्वसामान्यांना परवडत नसल्याची नाराजीही व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री कराड यांना लॉटरी लागणार

ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांसोबतच, आमदार नारायण कुटे यांच्याकडूनदेखील क्रिसेंट टॉवरमधील आलिशान घरासाठी अर्ज केला होता. पण कुटे यांना लॉटरी लागल्याने घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड म्हाडाच्या यादीत वेटिंगवर होते. पण आता आमदार कुचे यांनी घर घेण्यास नकार दिल्याने कराड यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: हसन मुश्रीफांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांनी घेतला समाचार, म्हणाले – पक्षाने काय करायचे? )

First Published on: August 26, 2023 3:42 PM
Exit mobile version