सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना बालमवार, क्षीरसागर वठणीवर आणणार

सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना बालमवार, क्षीरसागर वठणीवर आणणार

मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची थकीत वसुलीसाठी महापलिका आयुक्तांनी दिलेल्या डोसची मात्रा प्रभावशीर ठरली आहे. आजवर थकीत मालमत्ता कराच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करता येणार नाही, असे म्हणणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना उपायुक्त विजय बालमवार आणि सहायक आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी प्रत्येक विभागांची थकीत रकमेची जंत्रीच सादर करत वसुलीसाठी कामाला जुंपले आहे. तब्बल ३६८१ कोटी रुपयांची थकीत रक्कम वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे यंदा टार्गेट पूर्ण होणार नाही, असं म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षेपेक्षा अधिक कराची रक्कम वसूल करून घेण्यासाठी बालमवार आणि क्षीरसागर यांचे प्रयत्न दिसून येत आहेत.

पालिकेच्या करनिर्धारण – संकलन खात्याचा निर्धार

मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता-कर थकवणाऱ्या आणि वारंवार मागणी करुनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांबाबत करनिर्धारण आणि संकलन खात्याद्वारे कार्यवाही करण्यात येते. पहिल्या टप्प्यात मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत असून महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांकडे ३ हजार ६८१ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, खुली जागा, शासकिय,शैक्षणिक अशा विविध वर्गवारी अंतर्गत असणाऱ्या थकबाकीदार मालमत्तांचा समावेश आहे. या अनुषंगाने जप्ती तसेच अटकावणी किंवा पाणी तोडण्यासारखी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कराचा भरणा मुदतीतच करावा, असे आवाहन महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्यातर्फे करण्यात आले आहे.

मालमत्ता कराच्या रकमेचा भरणा संबंधितांद्वारे वेळेत केला जावा. तसेच थकबाकीदारांकडे बाकी असलेल्या रकमेचाही भरणा व्हावा. यासाठी महापालिकेच्या वतीने विविध स्तरीय कार्यवाही केली जात आहे. थकबाकीदारांवर केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये प्रामुख्याने पाणी तोडणे, जप्ती तसेच अटकावणी इत्यादी बाबींचा समावेश आहे.

या भागात सर्वाधिक मालमत्ता कराची थकबाकी

महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागातील थकबाकीची प्रकरणे व रक्कम

पालिकेचा चार्ट
पालिकेचा चार्ट
First Published on: February 12, 2019 3:55 PM
Exit mobile version