नाल्यावर बांधलेल्या ७१ बेकायदा गाळ्यांवर पालिकेचा हातोडा

नाल्यावर बांधलेल्या ७१ बेकायदा गाळ्यांवर पालिकेचा हातोडा

बांधकामावर हातोडा प्रातिनिधिक फोटो

अनेक वर्षांपासून या बांधकामाला विरोध होता. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ही बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्याने अखेर गुरुवारी हे गाळे जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेच्या नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर ७१ बेकायदा गाळे काढण्यात आले होते. वारंवार तक्रारी करूनही या बेकायदा बांधकामावर कारवाई होत नव्हती.
स्थानिक नगरसेविका उज्ज्वला पाटील यांनी याविरोधात महासभेतदेखील आवाज उठवला होता. परंतु, तत्कालिन आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी गाळे पाडण्याचे केवळ आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत गाळ्यांवर कारवाई झालेली नव्हती.

गणेश देशमुख यांनी महापालिकेचा कार्यभार हाती घेऊन अद्याप महिनाही झालेला नाही. तोच देशमुख यांनी शहरातील बेकायदा बांधकामे पाडण्याचा धडाका सुरू केला आहे. बेकायदा बांधकामे पाडण्यात राजकीय हस्तक्षेप झाला तरी त्याला न जुमानता कारवाईची धडक मोहीम देशमुख यांनी सुरूच ठेवली आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त गणेश साळवे, भगवान खाडे तसेच अधिकारी रमेश पाटील, भगवान पाटील, श्रीराम हजारे, सुरेश गांगरे, इंजिनियर राजेश कर्डिले, राहुल जाधव आरोग्य निरीक्षक संतोष सोनवणे आदींनी ही कारवाई आज केली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

First Published on: May 18, 2018 7:33 AM
Exit mobile version