उद्धव ठाकरेंना न भेटताच मुर्मू रवाना,राष्ट्रपती निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन

उद्धव ठाकरेंना न भेटताच मुर्मू रवाना,राष्ट्रपती निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना न भेटता दिल्लीला रवाना झाल्या. त्यामुळे भाजपने शिवसेनेला एकाकी पडल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुर्मू आजच्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे काही घडले नाही. मुर्मू यांनी आभाराबद्दल ठाकरे यांना साधा फोन सुद्धा करण्याची तसदी घेतली नसल्याचे समजते.

येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मुर्मू आज मुंबईत आल्या होत्या. हॉटेल लीला येथे मुर्मू यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मूंचे यांचे भाजप आणि शिंदे गटाला आवाहन –

दरम्यान, या निवडणुकीत आपल्याला विजयी करा, असे आवाहन मुर्मू यांनी केले आहे. यावेळी मुर्मू यांचे पालघर येथील आदिवासी बांधवांच्या पारंपरिक नृत्य,वाद्य यांच्या साथीने स्वागत करण्यात आले. मुर्मू यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे उपस्थित होते. दोन तासाच्या भेटीनंतर मुर्मू या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या.

First Published on: July 14, 2022 9:02 PM
Exit mobile version