माय महानगर फेसबुक पेजचे व्हिडिओ व्ह्यूज मुंबईत अव्वल, फेसबुक क्राऊडटँगलचा अहवाल

माय महानगर फेसबुक पेजचे व्हिडिओ व्ह्यूज मुंबईत अव्वल, फेसबुक क्राऊडटँगलचा अहवाल

‘आतली बातमी’ देण्यासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रसिद्ध असलेल्या ‘आपलं महानगर’ दैनिकाची ‘माय महानगर’ वेबसाईट तसेच व्हिडिओ सध्या राज्यात चर्चेचा विषय झाली आहे. खणखणीत राजकीय बातम्या आणि विश्लेषणासाठी राज्यातील जनता ‘माय महानगर’लाच पसंती देते, हे ‘फेसबुक क्राऊडटँगल’च्या मार्च महिन्यातील अहवालावरून स्पष्ट झाले आहे. या अहवालात माय महानगर फेसबुक पेजचे व्हिडिओ व्ह्यूज मुंबईत अव्वल असल्याचे दिसून आले.

या अहवालानुसार ‘माय महानगर’च्या ‘फेसबुक पेज’वरील ‘व्हिडिओ व्ह्यूज’ मार्च महिन्यात एक कोटी एक लाखाच्या (१०.१ मिलियन) घरात आहेत. त्याचवेळी मुंबईतील दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘फेसबुक पेज’चे व्हिडिओ व्ह्यूज ७७ लाख (७.७ मिलियन) आणि ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवरील ‘व्हिडिओ व्ह्यूज’ ६३ लाख (६.३ मिलियन) इतके आहेत. १ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील केवळ फेसबुक पेजवरील हे व्हिडिओ व्ह्यूज आहेत. फेसबुक क्राऊडटँगल सुविधेचा वापर करून हे व्ह्यूज स्पष्ट झाले आहेत. महाराष्ट्रात वृत्तपत्रांच्या फेसबुक पेजवर व्हिडिओ व्ह्यूजमध्ये लोकमत अग्रस्थानी आहे.

माय महानगरची वेबसाईट, यू ट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेज ताज्या बातम्यांसाठी वाचकांकडून प्राधान्याने बघितले जाते. राज्यातील ठळक राजकीय घडामोडी, त्याचबरोबर मुंबईतील राजकीय घडामोडींसाठी ऑनलाईन वाचक ‘महानगर’चेच व्हिडिओ बघतात. अनेक राजकीय पक्षांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून ‘महानगर’चे व्हिडिओ शेअर केले जातात. ‘फेसबुक’च्या अहवालानुसार ऑनलाईन न्यूज व्हिडिओ बघण्यासाठी मुंबईत वाचक ‘महानगर’लाच पसंती देतात, हे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत विविध राजकीय नेत्यांची मुलाखत ‘महानगर’ने घेतली आहे. यामध्ये राज्यातील कॅबिनेट मंत्री अनिल परब, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, नीतेश राणे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, शिवसेना खासदार अनिल देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या विशेष मुलाखती आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. शेकडो वाचकांनी या मुलाखती त्यांच्या हँडलवरून शेअरही केल्या आहेत. फेसबुक लाईव्ह आणि यू ट्यूबच्या माध्यमातून हे व्हिडिओ राज्यातील जनतेपर्यंत नेले जातात.

‘आपलं महानगर’कडे जिद्दीने काम करणारे आणि ‘आतल्या बातम्या’ वाचकांपुढे घेऊन जाणारे पत्रकार कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून व्यवस्थेतील त्रुटी, सामान्यांचे प्रश्न-अडचणी, राजकारणातील सुंदोपसुंदी, आर्थिक घडामोडी, मुंबईतील चाकरमान्यांचे जीवन प्रभावीपणे वाचकांपर्यंत नेले जाते. वाचकांचाही त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. महानगरकडे व्हिडिओ एडिटिंगसाठी (संकलन आणि संपादन) अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्याचबरोबर कुशल मनुष्यबळ आहे. या सर्वांचा एकत्रित परिणामामुळे अल्पावधीतच माय महानगर डॉट कॉम वेबसाईट आणि महानगरची सर्व सोशल हँडल्स हजारो लोकांनी लाईक आणि फॉलो केले आहे.

व्हिडिओ व्ह्यूज म्हणजे काय?

फेसबुक पेजच्या माध्यमातून विविध कालावधीचे व्हिडिओ थेट वाचकांपर्यंत नेता येतात. हे व्हिडिओ वाचक किती बघतात यावरून व्हिडिओ व्ह्यूज काढले जातात. फेसबुकच्या दृष्टीने १ मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्हिडिओ बघितला गेल्यास त्याला महत्त्व आहे. व्हिडिओ व्ह्यूजमध्ये संबंधित पेजवरून एका महिन्याच्या कालावधीत प्रसारित झालेले व्हिडिओ किती बघितले गेले हे समजू शकते.


 

First Published on: April 13, 2021 8:00 AM
Exit mobile version