कोरोना लसींचा पुरवठा करण्यास केंद्राची टाळाटाळ नाना पटोले यांचा आरोप

कोरोना लसींचा पुरवठा करण्यास केंद्राची टाळाटाळ नाना पटोले यांचा आरोप

कोरोना लसींचा पुरवठा करण्यास केंद्राची टाळाटाळ नाना पटोले यांचा आरोप

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली. कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. पण केंद्र सरकार महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी शनिवारी केला. कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून महाराष्ट्र पुन्हा जात आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. सध्याच्या वेगानेच लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास १२ वर्ष लागतील. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. पण केंद्र सरकार लसींचा पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहे. देशातही कोरोना रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तान आणि इतर देशांना लस पाठवत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर सिंग आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त श्मी शुक्ला प्रकरणी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. भाजप आणि फडणवीस यांची खोटे बोल पण रेटून बोला, अशी भूमिका आहे. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण असो किंवा परमबीर सिंग प्रकरण असो फडणवीस यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केल्याची टीका पटोले यांनी केली.

राऊतांना युपीए बाबत बोलण्याचा अधिकार नाही – नाना

युपीएचे अध्यक्ष बदलण्यात यावे असे वारंवार बोलले जात आहे. विशेषता शिवसेनेकडून अशा प्रकारची चर्चा होत आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत आता शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत. ते आता शिवसेनेचे नेते राहिले नाही आहेत अशा प्रकारचे वक्तव्य ते करत असतात. शिवसेना युपीएचे सदस्य नाही. त्यामुळे त्या पद्धतीचे वक्तव्य करण्याचा संजय राऊत यांना अधिकार नाही अशी आमची भूमिका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

First Published on: March 27, 2021 10:09 PM
Exit mobile version