कोरोनाविरोधातील लढ्यासाठी राणेंची कोटीची मदत

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी राणेंची कोटीची मदत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे

राज्यासह देशात सध्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या गंभीर संकट निर्माण झाले असून, कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यासाठी आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. नारायण राणे यांनी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. एवढेच नाही तर राणे आपले एक महिन्याचे वेतन देखील देणार आहेत.

कोकणी माणसालाही राणेंचा मदतीचा हात

दरम्यान, मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना नारायण राणे यांच्याकडून मदत केली जाणार आहे. सरकारने प्रवासाला बंदी घातल्यामुळे कोकणात पाठवणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे थांबणे हे तुमच्या आणि सर्वांच्या दृष्टीने हिताचे असल्याचे सांगत नारायण राणे यांनी तुम्हाला जी काही मदत लागेल ती सर्वोतोपरी केली जाईल. फक्त तुम्ही घरात थांबा, असे मुंबईकर कोकणवासीयांना आवाहन करण्यात आल्या आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, कल्याण या भागात सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे नारायण राणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सद्यस्थितीत सरकारने प्रवासाला बंदी घातली असल्याने कोकणात गावी पाठवणे शक्य नसल्याने कोकणवासीयांना मुंबईत जिथे आहात, तिथेच थांबा. हेच तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आहे. अन्नधान्य, वैद्यकीय मदत, औषधे आणि इतर कोणत्याही प्रकारची मदत राणेंच्या कार्यकर्त्यांकडून केली जाणार आहे.


हेही वाचा – हस्तमैथुनामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही; न्यू यॉर्क सरकारचा सल्ला


 

First Published on: March 30, 2020 3:39 PM
Exit mobile version